कुडाळ : पीएमश्री प्राथमिक शाळा कुंभारवाडा शाळेत नवागतांचे स्वागत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झाले. (Pudhari Photo)
सिंधुदुर्ग

Kudal School News | नवागतांच्या स्वागताला, पाऊसही सोबतीला

कुडाळ-कुंभारवाडा शाळेत स्वागतोत्सव ठरला यादगार; जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत 75 मुलांचा शाळाप्रवेश

पुढारी वृत्तसेवा

School Admission Ceremony

कुडाळ : आठ दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेला पाऊस.. मुलांचा शाळेचा पहिलाच दिवस त्यामुळे त्यांच्या आनंदाला आलेलं उधाण.. विविध वेशभूषेत, ‘चला चला शाळेत जाऊया प्रगती करूया’, ‘देशाचा होईल विकास घेऊया शिक्षणाचा ध्यास’, ‘सुख समृद्धीचा एकच झरा शिक्षण हा मार्गच खरा’ असे लक्षवेधी फलक घेतलेले पहिलीचे विद्यार्थी.. लेझीम पथक आणि ढोल - ताशांच्या गजरात कुडाळ - कुंभारवाडा शाळेच्या नवागतांचे स्वागत सोमवारी दिमाखात करण्यात आले.

या शाळेत प्रवेश घेतलेल्या 75 नवागत विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. मुलांनी शिक्षणाचा लाभ घेऊन चांगले नागरिक बनावे. पालकांनीसुद्धा मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी केले.

मे महिन्याच्या शालेय सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. गेले दीड ते दोन महिने सुट्टीमुळे शुकशुकाट असणार्‍या शाळा सोमवारी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या गर्दीने गजबजल्या. कुडाळ शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद, पूर्व प्राथमिक शाळा कुंभारवाडा शाळेच्या नवागतांचे स्वागत, गणवेश व शालेय साहित्य वितरण अशा सोहळ्याचे आयोजन सोमवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि. प. उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, नगरसेवक उदय मांजरेकर, गणेश भोगटे, केळबाई देवस्थानचे कृष्णा घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता आढाव,केंद्रप्रमुख महेश परुळेकर, मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली सावंत, प्राची आंगणे, सायली कदम, चैत्राली पाटील, गौरी गोसावी, स्वराली लाड, ऋतुजा गावडे,गुरुप्रसाद सावंत,दिपाली मोहिते आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले,कुंभारवाडा शाळेने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे.श्रीदेवी केळबाईच्या छायेखाली ही कुंभारवाडा शाळा असल्यामुळे या शाळेचा उत्कर्ष निश्चित आहे.आज शाळेचा पहिला दिवस आहे. नवनवीन विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. मुलांनी शिक्षणाचा लाभ घेऊन भविष्यात चांगले नागरीक बनावे. विद्यार्थी शाळेत शिकताना शिक्षकांपेक्षा पालकांसोबत जास्त वेळ असतो, त्यामुळे पालकांनी मुलांनी काय शिकले याबाबत त्याची उजळणी घेणे महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या शाळेत योगासह अन्य स्तुत्य उपक्रम राबवले जातात, त्याचा लाभ विद्यार्थी घेतो की नाही ? याबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिले.भविष्यात आपल्याला काय बनायचे आहे? ते स्वप्न आताच बाळगून विद्यार्थांनी वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.

शाळेच्या नवागतांचे स्वागत, गणवेश व शालेय साहित्य वितरण अशा सोहळ्याचे आयोजन सोमवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि. प. उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, नगरसेवक उदय मांजरेकर, गणेश भोगटे, केळबाई देवस्थानचे कृष्णा घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता आढाव,केंद्रप्रमुख महेश परुळेकर, मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली सावंत, प्राची आंगणे, सायली कदम, चैत्राली पाटील, गौरी गोसावी, स्वराली लाड, ऋतुजा गावडे,गुरुप्रसाद सावंत, दिपाली मोहिते आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले,कुंभारवाडा शाळेने अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे.श्रीदेवी केळबाईच्या छायेखाली ही कुंभारवाडा शाळा असल्यामुळे या शाळेचा उत्कर्ष निश्चित आहे.आज शाळेचा पहिला दिवस आहे. नवनवीन विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. मुलांनी शिक्षणाचा लाभ घेऊन भविष्यात चांगले नागरीक बनावे.

विद्यार्थी शाळेत शिकताना शिक्षकांपेक्षा पालकांसोबत जास्त वेळ असतो, त्यामुळे पालकांनी मुलांनी काय शिकले याबाबत त्याची उजळणी घेणे महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या शाळेत योगासह अन्य स्तुत्य उपक्रम राबवले जातात, त्याचा लाभ विद्यार्थी घेतो की नाही ? याबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिले.भविष्यात आपल्याला काय बनायचे आहे? ते स्वप्न आताच बाळगून विद्यार्थांनी वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून...

‘एक पेड मॉ के नाम’...

नव्याने दाखल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. प्रशालेत ‘एक पेड मॉ के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका ऋतुजा गावडे यांनी केले.आभार मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत यांनी मानले.

त्यांची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले...

सुरुवातीला जिल्हाधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत श्री देवी केळबाई मंदिराभोवती विविध वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांची रॅली काढत हा प्रवेशाचा सोहळा दैदिप्यमान करण्यात आला. लेझीम, ढोल पथक अशा संगीतमय वातावरणात या शाळेत पहिलीच्या वर्गात 75 मुले दाखल झाली. त्यांची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले असून त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शाळेने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT