

Sindhudurg School Reopening
सिंधुदुर्ग : सुमारे दीड महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोमवार, दि. 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. आजपासून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा पुन्हा गजबजणार आहेत. यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासनाच्या शाळांमधून प्रवेश घ्यावा, यासाठी प्रशासन कामाला लागले असून, पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’अंतर्गत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. मोफत पाठ्यपुस्तके त्याचप्रमाणे, गणवेश, बूट, पायमोजे इत्यादींचे मोफत वितरण केले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात यावर्षी पहिलीच्या वर्गात आतापर्यंत 3,309 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
शाळेच्या पहिल्या व दुसर्या दिवशी लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे वर्ग 1 व 2 चे शासकीय अधिकारी शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत. यावेळी शाळेतील भौतिक सुविधांचा दर्जा, पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्था, स्वच्छता सवयी, पोषण आहार याबाबत माहिती घेत मार्गदर्शन करणारं आहेत. शाळेची थोकादायक बांधकामे, शौचालये याबाबतची पाहणी करणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच योग्य त्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार शिक्षणासाठी शासन कटिबद्ध आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना जि. प. शाळांमध्येच दाखल करावे, असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे, समाज, पालक यांचा शिक्षणाचा दृष्टिकोन सकारात्मक करणे, बालकांनी आत्मविश्यासपूर्वक व्यक्त होणे, तसेच सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलव्ध करून देणे, यासाठी शासनाने अधिकार्यांमार्फत 100 शाळांना भेटी देणे हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांना पहिल्या दिवशी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी भेटी देण्याबाबतचे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
या नुसार कुडाळ-कुंभारवाडा शाळेला जिल्हाधिकारी अनिल पाटील, देवगड तालुक्यातील जामसंडे शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी दहीकर भेट देणार आहेत. याशिवाय तहसीलदार, गटविकास अधिकारी, अन्य अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या शाळांना भेटी देणार आहेत. यावेळी नवागतांचे स्वागत, मोफत पुस्तक वितरण त्याचबरोबर शाळांमधील कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता व इतर सोयीसुविधांचा आढावा घेतला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन केले जाणार असून लोकप्रतिनिधी तसेच अधिकार्यांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढविण्यासाठी उपाययोजना सूचवाव्यात, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकूण 1344 शाळा आहेत. पहिल्या दिवशी 16 जून रोजी लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक, विषयतज्ज, विशेष तज्ञ व विशेष शिक्षक असे सर्व 242 शाळांना भेटी देणार आहेत. तर मंगळवार 17 रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक, विषय तज्ज्ञ व विशेष शिक्षक 236 शाळांना भेटी देणार आहेत. ‘पहिले पाऊल’ या उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. भेटी देण्यात येणार्या शाळा संबंधित अधिकार्यांना एक वर्षासाठी दत्तक देण्यात आल्या आहेत. दतक शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाळांनी केलेल्या पटनोंदणी अहवालानुसार जिल्ह्यात पहिलीच्या वर्गात दाखल होणार्या मुलांची संख्या 5970 एवढी आहे. यापैकी लेली नाहीत. या मुलांना दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान 6 ते 14 वयोगटातील जि. प. शाळांमधून शिक्षण घेणार्या एकूण मुलांची पटसंख्या 51 हजार 668 आहे.
या वर्षी जिल्ह्यातील काही जि. प. शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात मुले दाखल झालेली नाहीत. शाळेच कार्यक्षेत्रात पहिलीत दाखल होणारी मुलेच नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सहाजिकच अश्या शाळांमधून या वर्षी पहिलीचा वर्ग नसणार आहे.