

Devgad Water Supply Issue
देवगड : कधी जलवािहिनी फुटणे तर कधी वीजपुरवठा खंडीत होणे या ना त्या कारणाने देवगड-जामसंडेचा पाणीपुरवठा ऐन पावसाळ्यातही बंद पडतो. दरम्यान दहिबांव गावातील वीजपुरवठा बंद झाल्याने देवगड-जामसंडेचा पाणीपुरवठा पुन्हा बंद पडला आहे. गेले तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांवर ऐन पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
दहिबांव येथील वीज समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.दहिबांव येथील वीज पुरवठा बंद पडल्यानंतर महावितरणकडून त्याची तात्काळ दखल घेतली जात नसल्याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शनिवारी रात्री 12 वा. बंद पडलेला वीजपुरवठा रविवारी दुसर्या दिवशी दुपारी 1.30 वा. सुरू झाला. मात्र एक तासाच्या आत पुन्हा वीजपुरवठा बंद झाल्याने पाण्याचे पंपींग कराता आले नाही. परिणामी या दोन्ही शहरांचा पाणीपुरवठा अद्यापही बंद आहे. लोकप्रतिनिधी मात्र सुशेगाद असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
* महावितरणच्या कारभाराबाबत संताप
* तीन दिवस पाणी नाही
* पावसाळ्यातही पाणी विकत घेण्याची वेळ
* लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून
* जनतेमधून तीव्र नाराजी