दोडामार्ग : दुचाकी वरून खैराचेे ओंडके नेणार्या दोन युवकांवर वन विभागाने कारवाई केली आहे. विशाल दीपक शेटकर( रा. तुळस ) व ऋतुकेश राजन डिचोलकर (रा. मातोंड, ता. वेंगुर्ला ) अशी संशयितांची नावे असून उगाडे-फोंडीये येथे शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकारी व कर्मचारी उगाडे फोंडीये येथे पाळतीवर होते. शुक्रवारी सायंकाळी येथील वनक्षेत्रात दोघे संशयित खैर झाडांचे लहान ओंडके दुचाकीवरून पिशवीत भरून वाहतूक करण्याचा प्रयत्न करत होते. वनरक्षक उमेश राणे यांनी त्यांची तपासणी केले.
यावेळी त्यांच्याकडील पिशवीत ओंडके आढळून आले. त्यामुळे दोघाही संशयीतांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. सहा.वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक उमेश राणे, शैलेश कांबळे, अजित कोळेकर, विश्राम कुबल वाहन चालक व इतर वन कर्मचारी यांनी ही कारवाई केली.