नांदगाव : कासार्डे उत्तर गावठण येथिल गवळदेव पूलाच्या सुरवातीलाच बुधवारी दुपारी भगदाड पडल्यानंतर गुरूवारी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली. या पुलाची तातडीने डागडुजी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागास दिले.
सरपंच निशा नकाशे, जि.प. माजी सदस्य संजय देसाई, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, जयवंती जमदाडे,श्वेता चव्हाण,तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष श्रीरंग पाताडे, तलाठी एस.बी जाधव, रवींद्र पाताडे, राजकुमार पाताडे, प्रसाद जाधव, आरेकर,शांताराम जाधव, महेश पाताडे, बाबाजी पाताडे,कासार्डे उत्तर गावठण ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तहसीलदार श्री. देशपांडे व गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यानी बांधकाम विभागास घटनास्थळावरून संपर्क करत दोन दिवसात उभियंता पाठवून तातडीने डागडुजी व नवीन पुलासाठी पाठपुरवा करण्यास सांगितले. ग्रामस्थांनीही पालकमंत्री नीतेश राणे याच्याकडे हे पूल नवीन मोठे करण्यात यावी अशी मागणी केली आहे.