सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : रेल्वेमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक

दिनेश चोरगे

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : कणकवली रेल्वे स्थानकासह अन्य रेल्वे स्थानकांवर रेल्वेमध्ये चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्य गुन्हेगार कणकवलीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने संशयित आरोपीस आज (दि.८)  सायंकाळी नरडवे नाका परिसरातुन अटक केली. दिलीप गोपाळ मिश्रा (वय २५ वर्षे, रा. रायसेन, मध्य प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कणकवलीसह अन्य रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेमध्ये चेन स्नॅचिंग करणारा दिलीप मिश्रा हा आरोपी कणकवली परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ए.के.हाडळ यांच्या पथकाकडून कणकवली परिसरात त्याचा शोध सुरू होता. नरडवे नाका बसस्टॉप परिसरात संशयितरित्या फिरत असताना आज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दिलीप मिश्रा याच्यावर मुर्देश्वरा पोलीस ठाणे, भटकळ राज्य कर्नाटक, पनवेल रेल्वे पोलिस ठाणे, कल्याण रेल्वे पोलिस ठाणे, सिकंदराबाद रेल्वे पोलीस ठाणे राज्य हैदराबाद या ठिकाणी रेल्वेमधील १४ ते १५ चेन स्नेचिंग व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कणकवली पोलिसांनी आरोपी मिश्रा यांची अधिक चौकशी केली असता त्याने २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी कणकवली रेल्वे स्थानक येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची माळ जबरीने खेचून नेले असल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे व पोलीस शिपाई श्री.माने यांनी केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT