Pinguli Lake Construction 
सिंधुदुर्ग

Pinguli Lake Construction | पिंगुळी पाझर तलावानाजवळील विकासकामांना स्थगिती!

Pinguli Lake Construction | आ. नीलेश राणे : पिंगुळी तलाव बचाव आंदोलनाला यश

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणारून जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोडी घडली. आ. नीलेश राणे यांनी गुरुवारी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांना पाठिंबा दिला.

त्यानंतर प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित मिक्लतीतील सुरू विकासकामे पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याची, शेतकऱ्यांचे वहावटीचे रस्ते खुले करण्याची आणि तलावातील पाणी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेण्याची घोषणा केली.
आ. राणे म्हणाले, आपण सर्वप्रथम पिंगुळी ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांची भेट घेतली. तलावाला हात लावला जाणार नाही आणि मंजूर आराखड्यातील पायवाट बंद केली जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. आपण बिल्डर किंवा डेव्हलपरच्या बाजूने नसून जनता आणि कोकणाच्या बाजूने उभे आहोत.

ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रकल्पाचे काम थांबवण्याबाबत आपण तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आंदोलनकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात सहा ते सात मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बिनशेतीचा आदेश रद्द करणे, वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करणे आणि तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या निर्देशानुसार संबंधित मिक्लतीतील सुरू असलेले विकासकामे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावीत, असे संबंधित कंपनीला कळवण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर त्यांच्या वापरासाठी कोणताही अडथळा निर्माण नये आणि हे रस्ते तातडीने खुले करून द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

आश्वासनानंतरही आंदोलन सुरूक!

दरम्यान, प्रशासनाच्या निर्णया्यानंतर आगामी दिवाळीचे दिवस लक्षात घेऊन गंगाराम सडवेलकर यांनी आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती प्रभारी प्रांताधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पिंगुळी तलाव बचाव आंदोलनाला आता प्रशासकीय निर्णयाच्या रूपाने महत्त्वाचे वळण मिळाले आहे; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे उपोषण आंदोलन सुरूच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT