

संशयित साहिल धुरी पाच तासांत मठ-वेंगुर्ले येथून ताबात
चौकशीत संशयिताकडून गुन्ह्याची कबुली
प्रेमाला नकार दिल्याचा राग
न्यायालयाकडून २४ पर्यंत पोलिस कोठडी
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे महाविद्यालयीन विद्यार्थीनी दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे, खालची पालवाडी) या तरुणिका निर्घृण खून प्रकरणाचा सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवघ्या पाच तासांत उलगडा केला.
या प्रकरणी पोलिसांनी साहिल विश्राम धुरी (२२, रा. मठ, धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याला शुक्रवारी रात्री ११ वा. च्या सुमारास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. दामिनीने प्रेम स्वीकारण्यास नकार दिल्याचा रागातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वर्दे-खालची कुंभारवाडी येथील सायल्याच्या ओहोळावरील पुलाजवळ, कडावल-वर्दे रस्त्यापासून सुमारे ७० मीटर अंतरावर शनिवारी सायं. ६.१५ वा. च्या सुमारास दामिनीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. दामिनीचे वडील किरण पालव यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साहिल धुरी आणि दामिनी पालव यांची ओळख झाली होती. ती ओळख ही रूपांतर साहिलच्या मनातील एकतर्फी प्रेमात झाल्याचा संशय आहे.
मात्र, दामिनीने त्याच्या प्रेमाला नकार दिल्याने तो संतप्त होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. याच रागातून त्याने दामिनीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दामिनी तालुक्यातील एका महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम करत होती. दरम्यान साहिल हा मोटरसायकल घेऊन तिच्या रस्त्यात थांबला होता.
त्याने दामिनीला अद्भूत प्रेम स्वीकारण्याचा आग्रह केला मात्र तिने नकार दिल्याने तिच्यावर धारदार शस्त्रने हल्ला केल्याचा संशय आहे. यावेळी दोघांमध्ये झटापट झाल्याची सांगण्यात येत आहे.
दामिनीने प्रतिकार करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र साहिलने तिच्यावर वार केले. तिचा घटनास्थलлығы मृत्यू झाला. या झटापटीत साहिलच्या हाताच्या एक बोटालाही दुखापत झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर साहिल मोटरसायकलवरून घरी परतला. अस्वस्थ असल्याचे घरच्या मंडळींच्या लक्षात आले; मात्र त्याने त्याबाबत काहीही सांगितले नाही.
सायल्याच्या ओहोळावरील पुलाजवळ रस्त्यावर एक तरुण मोबाईलवर बोलत असताना त्याला ओहोळाच्या दिशेने झटापटीचा आवाज ऐकू आला. त्याने तेथून जाणाऱ्या ग्रामस्थांना याची माहिती दिली.
आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता दामिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. वर्दे सरपंप पप्पू पालव यांनी पोलिस पाटलांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, ग्रामस्थांनीही घटनास्थलळी गर्दी केली. घटनास्थलळी मोटरसायकलवरून आलेल्या एका अनोळखी तरुणाला काही ग्रामस्थांनी पाहिले होते. या संदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी राजेश भगवत आणि कुडाळ पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थलळी दाखल झाले. फॉरेंसिक पथकाला पाचारण करण्यात आले.
श्वानपथकाच्या मदतीने संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस अधीक्षक यांच्या सचेतनेनुसार, सिंदूरर्गनगरी, निवती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची अशी पाच पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. जिल्हाभर नाकाबंदीही करण्यात आली.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक साहिल धुरी याच्या मठ येथील घरी पोहोचले.
शुक्रवारी रात्री ११ वा. च्या सुमारास तो जेवण करून झोपलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत साहिले गुन्ह्याची कबुली दिलीची माहिती देण्यात आली. त्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वेय खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
संशयित साहिला रविवार कुडाळ न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. खुनासाठी वापरलेले धारदार शस्त्र कोणते, संशयित घटनास्थलळी कोणल्या मार्गाने आला आणि कोणत्या मार्गाने परतला, या गुन्ह्यात अन्य कोणी मदत केली का याची पूर्वोपोजित होती का, या बार्बीचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दामिनीही दोन दिवसानंतर नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईला जाण्याची तयारी करत होती, मात्र त्याचपूर्व दामिनीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे वर्दे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संशयित साहिल यांचे मोबाईल पोलिसांना मिळाले आहेत का, याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, काही वस्तू मिळाल्याचे पोलिस निरीक्षक बडवे यांनी सांगितले; मात्र मोबाईलबाबत त्यांनी स्पष्ट माहिती टाळले.
दामिनीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी तिच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, वैभव नाईक यांनी दामिनीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. संशयिताला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी आपण कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे विश्वास त्यांनी दिला.