मंत्री दीपक केसरकर. (File photo)
सिंधुदुर्ग

Deepak Kesarkar | खरात प्रकरणावर दीपक केसरकर आक्रमक! व्हिडीओ जारी करत मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, "केवळ ओळखीचा विपर्यास नको"

Deepak Kesarkar | अशोक खरात सोबतच्या व्हायरल फोटोंबाबत आ. दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

कॅप्टन अशोक खरात यांना झालेल्या अटकेनंतर त्यांचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आ. दीपक केसरकर यांनी एक व्हिडीओ क्लिप प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

खरात यांच्यावर झालेल्या आरोपांचा निषेध करतानाच, केवळ ओळखीमुळे फोटोंचा विपर्यास करणे चुकीचे असल्याचे आ. केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या स्पष्टीकरणातील महत्त्वाचे मुद्दे व्हायरल झालेला एक फोटो हा ईशानेश्वर मंदिरासाठी रस्त्याची मागणी करण्यासाठी श्री. खरात हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होता त्यावेळचा आहे.

दुसरा फोटो खरात यांच्या मुलीच्या लग्नातील असून, ओळखीच्या नात्याने आपण तिथे शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे आ. केसरकर यांनी स्पष्ट केले. खरात यांच्यावर असलेले आरोप घृणास्पद असून आपण त्याचा निषेध करतो,

असे सांगून या प्रकरणाची चौकशी न्यायालय करेलच, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. केसरकर यांनी शेवटी विनंती केली की, केवळ राजकीय वैमनस्यातून कोणाचेही जुने फोटो प्रसिद्ध करून गैरसमज पसरवू नयेत.

ते एकदाही माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत

खरात आणि आपली ओळख सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिरामुळे झाली होती. तसेच खरात यांचा अॅस्ट्रोनॉमी (खगोलशास्त्र) विषयातील अभ्यास असल्याने अनेक लोक त्यांना ओळखत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केलेले आरोपही आ. केसरकर यांनी फेटाळून लावले आहेत. "खरात माझे डिपार्टमेंट चालवत होते हे धादांत खोटे आहे, ते एकदाही माझ्या ऑफिसमध्ये आलेले नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT