खाडीच्या पाण्यात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह आढळला file photo
सिंधुदुर्ग

खाडीच्या पाण्यात बुडालेल्या तरूणाचा मृतदेह आढळला

वीरवाडी येथे कालवे काढण्यासाठी गेला असता तरूण पाण्यात बुडाला होता.

पुढारी वृत्तसेवा

Body of youth who drowned found

देवगड : पुढारी वृत्तसेवा

कालवे काढताना खाडीच्या पाण्यात बुडालेल्या प्रदीप चंद्रकांत बाईत (वय ३३, रा. नाडण वीरवाडी) या तरुणाचा मृतदेह बाडातर हनुमान मंदिरानजीकच्या मागील बाजूस सोमवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास खाडी किनारी आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

पोलिसांनी या विषयी दिलेल्या अधिक माहितीनुसार, प्रदीप बाईत हा १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसमवेत वीरवाडी खाडी येथे कालवे काढण्यासाठी गेला होता. त्याने पाण्यात डुबकी मारल्यानंतर तो बेपत्ता झाला होता.

सहकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, शोध न लागल्याने तो बेपत्ता असल्याची फिर्याद त्याचा भाऊ कैलास चंद्रकांत बाईत (२१, नाडण वीरवाडी) याने देवगड पोलीस स्थानकात दिली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास प्र दीप बाईत याचा मृतदेह बाडातर हनुमान मंदिरानजीकच्या मागील बाजूस खाडीकिनारी आढळून आला.

या घटनेची फिर्याद कैलास बाईत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत. प्रदीप बाईत याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT