नेमळे फौजदारवाडी येथे अपघातात उलटलेली गोमांस वाहतूक करणारी कार. 
सिंधुदुर्ग

सावंतवाडी : अपघातग्रस्त कारमधून ६०० किलो गोमांस जप्त

अपघातग्रस्त कारमधून ६०० किलो गोमांस जप्त

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : बजरंग दलाचे कार्यकर्ते पाठलाग करत असल्याचे पाहून कार वेगात पळविण्याचा नादात कारचा टायर फुटल्याने अनियंत्रीत झालेली कार थेट दुभाजकावर आदळून सुमारे गाडीतून सुमारे ६०० किलो गोमांस ताब्यात घेण्यात आले. पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेला संशयित सद्दाम दावलसाब येलवट्टी (वय ३१, रा. गदग, कर्नाटक) याला कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सद्दाम येलवट्टी ५० फूट खोल खड्‌यात कोसळली. या सावंतवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे-फौजदारवाडी येथे घडली.

निपाणी-राधानगरीमार्गे गोवा-आरपोरा अशी गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्याना मिळाली होती. यानुसार या कार्यकर्त्यांनी झाराप येथे महामार्गावर पाळत ठेवली होती. शुक्रवारी सकाळी ही कार येथे आली असता कार्यकर्त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत आहे हे पाहून संशयिताने कार आणखी वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. यात टायर फुटल्याने कारला अपघात झाला. अपघातामुळे कारमधील गोमांस बाहेर फेकले गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT