Savarde Railway Station | सावर्डे रेल्वे स्टेशनसाठी पादचारी उड्डाण पुलाला मंजुरी

कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटनेच्या अनेक वर्षांच्या मागणीला मिळाले यश
Savarde Railway Station
Savarde Railway Station
Published on
Updated on

सावर्डे : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे रेल्वे स्थानकासाठी ओव्हर ब्रिज मंजूर झाला आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या मागणीला यश आले आहे. कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे व सदस्यांनी याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. त्या शिवाय सावर्डे रेल्वे स्थानकातील अनेक समस्यादेखील मांडल्या होत्या.

सावर्डे रेल्वे स्थानकात अनेक समस्या असून फलाट क्र. १ वर प्रवाशांना उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्धआहे, परंतु फलाट क्र. २ वर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने प्रवाशांना चिखलात अथवा गवतामध्ये उतरावे लागते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.

Savarde Railway Station
Deputy Collector Suspension | उपजिल्हाधिकारी निशा कांबळे निलंबित

याशिवाय एका फलाटावर गाडी असेल तर दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांना त्रास होतो. यामुळे ओव्हरब्रिजची मागणी करण्यात आली होती. आ. शेखर निकम यांनी देखील या बाबत कोकण रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेऊन सावर्डे रेल्वे स्टेशन येथील फलाट क्र. १ वरून २ कडे जाण्यासाठी प्रवासी पादचारी उड्डाण पूल मंजूर झाला आहे.

सुमारे १ कोटी ६० लाख रूपये अंदाजित खर्चाला कोकण रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. तसे पत्र संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांना देण्यात आले आहे. याशिवाय सावर्डे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. फलाट क्र. १ वर प्लॅटफॉर्म असून फलाटावरील प्रवाशांना अनेकवेळा भिजत रहावे लागते तर फलाट २ वर शेडच उपलब्ध नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे.

Savarde Railway Station
'अंजनवेल, वेलदूर, रानवी'चा चार कोटींचा कर थकीत

सावर्डे व संगमेश्वर तालुका परिसरातील ६० गावांतील प्रवासी सावर्डे रेल्वे स्टेशनमधून प्रवास करीत असतात. त्यामुळे या मागणीची रेल्वेने अनेक पाठपुराव्यानंतर दखल घेतली आहे. उर्वरित समस्यादेखील लवकरच सोडवाव्यात, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news