कोकण

Sindhudurg : कुडाळ नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून दोन, तर भाजपकडून एक अर्ज!

backup backup

कुडाळ ः पुढारी वृत्तसेवा  कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणूक रिंगणात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या आफरीन करोल व शिवसेनेच्या श्रेया गवंडे यांनी तर भाजपकडून सौ. प्राजक्ता बांदेकर यांनी प्रत्येकी एक प्रमाणे एकूण तीन उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याकडे सादर केले. ते तिन्ही अर्ज छाननीत वैध्य ठरले. यावेळी दोन्ही गटांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, भाजपच्या विद्यमान नगरसेविका सौ. संध्या तेरसे व महाविकास आघाडीमधील नवनिर्वाचित नगरसेविका अक्षता खटावकर यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी नगरसेवक गणेश भोगटे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. सोमवार 14 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष निवडणुकीत काय घडणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Sindhudurg)

नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप कार्यालयाकडे मंगळवारी सकाळीच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले होते. कुडाळचे नगरध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच होती. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्फत पाठविलेल्या पत्राचा लखोटा कार्यालयात भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी ओपन केला, त्या पत्रात नवनिर्वाचित नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांचे नाव नमुद होते. त्यानंतर भाजपा नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते दु. 12.30 वा.च्या सुमारास न. पं.कडे रवाना झाले . त्या नंतर मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याकडे सौ. प्राजक्ता बांदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपा कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, नवनिर्वाचित गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नीलेश परब, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगरायध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी सेल अध्यक्ष दिपक नारकर, श्रीपाद तवटे, सौ. रेखा काणेकर, राकेश कांदे, साक्षी सावंत आदी उपस्थित होते. (Sindhudurg)

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना शाखेजवळ जमा झाले. त्यानंतर दुपारी 12.45 वा.च्या सुमारास न.पं.कडे दाखल झाले. आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या आफरीन करोल व शिवसेनेच्या श्रेया गवंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, गटनेते मंदार शिरसाट, किरण शिंदे, उदय मांजरेकर, सई काळप, श्रृती वर्दम, ज्योती जळवी, काँग्रेसच्या नगरसेविका अक्षता खटावकर, कुडाळ शिवसेना तालुका प्रवक्ते संजय भोगटे, अतुल बंगे, काँग्रेसचे विजय प्रभु,अरविंद मोंडकर, मंदार शिरसाट,कोल्हापुर शहर काँग्रेसचे सचिन चव्हाण,अ‍ॅड गुलाबराव घोरपडे, सयाजी शिर्के, प्रदिप सरनाईक, प्रविण पाटील, अर्जुन सपटे, चेतन पडते आदी उपस्थित होते.

कुडाळ येथील निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आघाडी करून तर काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. आता काँग्रेसचे संपर्क मंत्री सतेज पाटील तसेच महाविकास आघाडीचे नेते यांनी एकत्र चर्चा केली व या ठिकाणी शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष देण्यात येतील असे ठरविले. यामध्ये पहिल्या अडीच वर्षाकरिता काँग्रेसचा नगराध्यक्ष व शिवसेनेचा उपनगराध्यक्ष असेल, तर पुढिल अडीच वर्षाकरीता शिवसेनेचा नगराध्यक्ष व काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असेल असा निर्णय घेण्यात आला आहे. महा विकास आघाडीच्या माध्यमातून येथे सत्ता स्थापन झाल्यानंतर आम्ही चांगले काम करू, असा विश्वासही आ. नाईक यांनी व्यक्त केला.

माजी नगरसेवक गणेश भोगटेही गैरहजर

कुडाळ नगरपंचायत निवडणूक निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण होवून दोन जागा विजयी झालेली काँग्रेस 'किंगमेकर'च्या भूमिकेत राहिली होती, अशातच केळबाई प्रभागातून अक्षता खटावकर यांना निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेले माजी नगरसेवक गणेश भोगटे हे सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी उपस्थित राहिले नाहीत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता मी नाराज आहे, पण माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नाही तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जस ठरलं तस आज शिवसेनेकडून झालं नाही. शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून काँग्रेसला एक प्रकारे चेकमेट देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत शिवसेना आ. वैभव नाईक यांच्याकडून आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. एकूणच कुडाळमध्ये काँग्रेस संपविण्याचे काम आ. नाईक करत आहेत. अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता प्रत्यक्ष नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडीवेळी गणेश भोगटे यांचा विजयी उमेदवार सौ. अक्षता खटावकर काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Sindhudurg)

भाजपा नगरसेविका संध्या तेरसेंची अनुपस्थिती

नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी भाजपच्या हिंदू कॉलनी प्रभागाच्या नगरसेविका संध्या तेरसे अनुपस्थित होत्या, मात्र उर्वरित सात नगरसेवक उपस्थित होते. सौ. तेरसे या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या, मात्र वरिष्ठांकडून त्यांचे नाव न आल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत सौ. तेरसे यांच्याशी संपर्क साधला असता आपण नाराज नसुन वरिष्ठांनी सुचविलेल्या नावाला आपली पसंती आहे. एका महत्त्वाच्या कामामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहिले नसल्याचे सांगितले. तरीही 14 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान त्या उपस्थित राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Sindhudurg)

भाजपा नगरसेविका संध्या तेरसेंची अनुपस्थिती

नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी भाजपच्या हिंदू कॉलनी प्रभागाच्या नगरसेविका संध्या तेरसे अनुपस्थित होत्या, मात्र उर्वरित सात नगरसेवक उपस्थित होते. सौ. तेरसे या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होत्या, मात्र वरिष्ठांकडून त्यांचे नाव न आल्याने त्या नाराज असल्याची चर्चा होती. याबाबत सौ. तेरसे यांच्याशी संपर्क साधला असता आपण नाराज नसुन वरिष्ठांनी सुचविलेल्या नावाला आपली पसंती आहे. एका महत्त्वाच्या कामामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहिले नसल्याचे सांगितले. तरीही 14 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी दरम्यान त्या उपस्थित राहणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. (Sindhudurg)

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT