कणकवली : पुढारी वृत्तसेवा मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाका येथे आज (बुधवार) सकाळी 8 वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली. मात्र सकाळी 10 वाजता सिस्टीमधील तांत्रिक बिघाडाचे कारण देत टोल वसुली थांबवण्यात आली. दरम्यान टोल मुक्त कृती समितीसह सर्वपक्षीय मंडळींनी त्या ठिकाणी येऊन सिंधुदुर्गवासीयांकडून टोल वसुली होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. टोल वसुली कंपनीच्या व्यवस्थापकाने स्थानिक प्रश्न प्रलंबित असल्याने लोकांचा विरोध लक्षात घेता टोल वसुली तूर्तास करू शकत नाही असे पत्र महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले. ते पत्र टोल मुक्त कृती समितीला दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, या तात्पुरत्या स्थगितीवर आम्ही समाधानी नसून, टोल वसुली सुरू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा कृती समितीने दिला. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, संजय भोगटे तसेच ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत, सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पीळणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अभय शिरसाट, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाध्यक्ष भूषण परुळेकर, भाजपचे कणकवली मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ओसरंगाव सरपंच सुप्रिया कदम यांच्यासह नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळालीच पाहिजे. तोपर्यंत टोलवसुली करू देणार नाही असा इशारा दिला. सुमारे दीड तास हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणावर तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा :