कोकण

सिंधुदूर्ग: आचरा- पिरावाडी शाळेत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

अविनाश सुतार

आचरा: पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस व वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा-पिरावाडी येथे शनिवारी (दि.१५) सकाळी झाला. हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आणि 'दै. पुढारी' सिंधुदुर्गच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, आचरा गावचे माजी सरपंच अनिल करंजे, आचरा येथील पेपर विक्रेते विरेंद्र पुजारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, उपाध्यक्ष पूर्वा तारी, पोलीस मुन्ना पुजारे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, शिक्षक संदीप कवडे, जयमाला उदगिरे, स्मिता परब, वर्षा गोसावी आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी आचरा येथील वृत्तपत्र विक्रेते विरेंद्र पुजारे यांचा शाल व श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी रुद्र बागवे  यांने डॉ. कलाम यांची वेशभूषा करत मनोगत व्यक्त केले. रिया आचरेकर हिने दै. पुढारी वृत्तपत्रातील डॉ. कलाम यांच्यावरील लेख वाचून दाखवला. तसेच हिंदी, इंग्रजी पुस्तकातील गोष्टींचे विद्यार्थ्यांनी वाचन केले.

आचरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, माजी सरपंच अनिल करंजे, विरेंद्र पुजारे यांनी मनोगत व्यक्त केले. गौरी उदगिरे, मयुरेश धुरी या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचलन केले. तर मुख्याध्यापक सुभाष नाटेकर यांनी आभार मानले. यावेळी शालेय समिती सदस्य, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT