कोल्हापूर : सावर्डे दुमाला शाळेत ‘स्वावलंबी शिक्षणाचा जागर’ उपक्रम उत्साहात | पुढारी

कोल्हापूर : सावर्डे दुमाला शाळेत 'स्वावलंबी शिक्षणाचा जागर' उपक्रम उत्साहात

शिरोली दुमाला; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील विद्या मंदिर सावर्डे दुमाला शाळेमध्ये दै. पुढारीच्या वतीने आयोजित ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम गावातून वाजतगाजत प्रभात फेरी काढून उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्या मंदिर सावर्डे दुमाला शाळेत सकाळी आठ वाजता सजवलेल्या सायकलवर अब्दुल कलाम यांची प्रतिमा लावून त्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. माजी सरपंच संतोषकुमार पाटील, पंढरीनाथ मोहिते यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेते भगवान पाटील व कलाम यांच्या वेशभूषेतील आदर्श कारंडे याचा सत्कार मुख्याध्यापक शिवाजी वेदान्ते यांच्या हस्ते झाला. त्यानंतर फुलाने सजविलेली सायकल घेऊन वेशभूषेतील विद्यार्थी, वृत्तपत्र विक्रेते यांच्यावर फुलांचा वर्षाव करत प्रभात फेरीला प्रारंभ झाला.

फेरीदरम्यान वि.स.खांडेकर वाचनालयात वृत्तपत्र विक्रेते यांच्या हस्ते डॉ.कलाम यांच्या फोटोचे पूजन करून ग्रंथपाल कृष्णात पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सरपंच कुंडलिक कारंडे यांनी विद्यार्थी व विक्रेत्यांचे स्वागत केले. प्रभात फेरीवेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दै. पुढारी वृत्तपत्राचे वाटप केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दै. पुढारीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. प्रभात फेरीनंतर शाळेत विद्यार्थ्यांची डॉ.कलाम यांच्याविषयी भाषणे झाली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.के.निकम, सागर कारंडे, साई नलवडे, राजु भोसले, पंढरीनाथ निकम, अध्यापक बळवंत पाटील, शिक्षिका, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आभार पत्रकार युवराज पाटील यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button