Dogs Pudhari
रत्नागिरी

Stray Dog Ratnagiri| जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची वाढली दहशत !

Stray Dog Ratnagiri| अकरा महिन्यांत ३ हजार १०३ जणांना श्वानदंश; झुंडींचा बंदोबस्त करण्यात प्रशासन सपशेल फेल

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जाकीर हुसेन पिरजादे

रत्नागिरी जिल्ह्यात मोकाट, भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्वानदंशाच्या घटनाही वाढत आहेत. शहरासह ग्रामीण भागात १५ ते २५ कुत्री झुंडीने फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. १ एप्रिल २०२५ ते १५ मार्च २०२६ दरम्यान तब्बल ३ हजार १०३ जणांना मोकाट, भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्यात आहेत, यात एकाचाही मृत्यू नाही.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, प्रशासन फेल ठरली असून सुप्रिम कोटनि दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. अद्याप बंदिस्त कुत्र्यांसाठी निवारा केंद्राची उभारणी करण्यात आलेली नाही रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस मांडला आहे.

झुंडीने फिरणारी कुत्रे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनीवर हल्ला चढवून जखमी करीत आहेत. दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. हजारो लाखोंच्या संख्या ही मोकाट कुत्र्यांची संख्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोकाट, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरासह तालुक्याच्या ठिकाणी चिकन, मटण विक्रीची दुकाने, मांसाहारी हटिल, चायनीज दुकाने, मच्छी मार्केट या परिसरात कुत्र्यांचा बावर वाढला आहे. रस्त्यावरच चिकन, मटणचे तुकडे खाण्यासाठी कुत्री गर्दी करतात.

यावेळी एकटे असलेले चिमुकले, ज्येष्ठ नागरिकांवर ही कुत्री हल्ला करीत आहेत. मोकाट कुत्री वाढली आहेत, मात्र पकडण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करून निर्बिजीकरण करणे गरजेचे आहे. सर्वाधिक श्वानदंश रत्नागिरी, दापोली, संगमेश्वर व लांजा तालुक्यात झाली आहेत.

कोर्टाचे आदेश; अंमलबजावणी नाहीच!

वाढत्या मोकाट कुत्र्यांची संख्या, चिमुकल्यासह ज्येष्ठ नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सुप्रिम कोटनि शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, रेल्वे, बसस्थानके यासह विविध शासकीय कार्यालयवाहेरील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, असे आदेश दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट कमालीचा वाढला आहे. मोकाट कुत्री मोठ्या झुंडीने फिरत आहेत. एकट्या दिसणाऱ्या चिमुकल्यंवर, ज्येष्ठांवर हल्ला ती करीत आहेत. अशा मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी करणे गरजेचे आहे.

Ratnagiri Shivbhojan Thali | शिवभोजन केंद्रांसाठी जिल्ह्याला दीड कोटी मंजूरअद्याप शेल्टर होम नाहीच!

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांना हटवून त्यांना शेल्टर होममध्ये ठेवावे तसेच लसीकरण व नसबंदी करावी. कुत्र्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडू नये असे सुप्रिम कोटाने आदेश दिले होते. मात्र अद्याप शहरासह ग्रामीण भागात शेल्टर होम झालेले नाही. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेय, मात्र पकडण्याची तीव्रता कमी झाली आहे. नसबंदी, लसीकरणही वाढवणे गरजेचे आहे. सरकारीसह खासगी ठिकाणी रेबीज इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT