Cannabis Plantation 
रत्नागिरी

Cannabis Plantation | कोटकामते येथे 23 गांजाची झाडे जप्त

Cannabis Plantation | जिल्ह्यात गांजाच्या उभ्या पिकावर कारवाई करण्याची पहिलीच वेळ

पुढारी वृत्तसेवा

देवगड : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग पोलिसांनी अमली पदार्थाविरोधातील मोहिमेंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई केली असून, कोटकामते आडीवरेवाडी येथील एका घराच्या परिसरात गांजा लागवड केलेली २३ झाडे जप्त केली. पोलिसांनी संशयित आरोपीविरूद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई २९ मे रोजी केली गेली.

जिल्ह्यात लागवड केलेल्या गांजाच्या उभ्या पिकावर करण्याची ही पहिलीच कारवाई असून, या कारवाईने खळबळ उडाली आहे. पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून कोटकामते आडीवरेवाडी येथील रहिवाशी ओंकार राजाराम कोतेकर (३०) याने आपल्या घराच्या परिसरात गांजा पिकाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम बुवा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी सहायक पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, गणपती गावडे, पो.कॉ. प्रसाद आचरेकर, रविंद्र महाले हे पथकात सहभागी होते.

या पथकाने कार्यवाहीसाठी दोन शासकीय पंच, कृषी अधिकारी, छायाचित्रकार, वजनकाटाधारक, फॉरेन्सीक पथक यांना घटनास्थळी पाचारण करून संशयितांनी लागवड केलेली गांजाची रोपे यांचा पंचनामा केला. ४९ हजार रूपये किंमतीची, २ किलो ४५० ग्रॅम वजनाचे ताजे ओलसर गडद हिरव्या रंगाची, उग्र वासाची, ३ ते ५ फुट उंचीची २३ गांजाची झाडे जप्त केली.

घराच्या परिसरामध्ये केली होती गांजा पिकाची लागवड

संशयिताने आपल्या राहत्या घराच्या परिसरामध्ये गांजा पिकाची लागवड केल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिस हवालदार महेंद्र महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अवैधरित्या गांजा लागवड केल्याप्रकरणी ओंकार कोतेकर याच्यावर गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT