रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी जिल्ह्यात लग्नसराई व सणासुदींच्या दिवशी बटाटा, टोमॅटो, वांगी यांची लज्जतदार भाजी आवडीने खाल्ली जाते; परंतु जिल्ह्यात बटाट्याचे पीक घेतले जात नाही. त्याचवेळी वांगी आणि टोमॅटो फारच नगण्य क्षेत्रात पिकवला जात आहे.
या भाजीसाठी लागणारे वाटण आणि फोडणीसाठी वापरला जाणारा कांदाही जिल्ह्यात पिकत नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाकडील नोंदीनुसार २०२४-२५ मध्ये वांगी पिकाखाली केवळ ३८. २५ हेक्टर क्षेत्र आहे. यातील ३७.७५ हेक्टर क्षेत्र ओलिताखालील आहे.
तसेच मंडणगड तालुक्यात केवळ ५ हेक्टर क्षेत्रात वांग्याचे पीक घेतले जाते. खेड ११ हेक्टर, चिपळूण ३ हेक्टर, गुहागर ३ हेक्टर, राजापूर ०.२५ हेक्टर आणि संगमेश्वर तालुक्यातील १ हेक्टर क्षेत्रात वांगी पिकवली जातात. रत्नागिरी, लांजा तालुक्यात वांग्याचे पीक फारच कमी प्रमाणात किंवा घेतले जात नाही.
ST Digital Payment Issue | लालपरी'चे डिजिटल पेमेंट फेल! सर्व्हर डाऊनमुळे प्रवासी त्रस्त, खिशात रोख ठेवण्याचे आवाहनरत्नागिरी जिल्ह्यातील १४.७५ हेक्टर क्षेत्रात टोमॅटो पिकवला जातो. हे सर्व क्षेत्र ओलिताखालील क्षेत्र असून गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यात टोमॅटो पिकवला जात नाही. दापोली तालुक्यात ५ हेक्टर क्षेत्रात, खेड तालुक्यात ३ हेक्टर, तर चिपळूण तालुक्यात २ हेक्टर क्षेत्रात टोमॅटोचे पीक होते. बटाटा आणि कांद्याचे जिल्ह्यात कुठेही पीक होत नाही. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या बटाटा आणि कांद्याच्या मदतीने सर्वांच्या आवडीची बटाटा, टोमॅटो, वांग्याची भाजी मात्र मोठ्या प्रमाणात खाल्ली जात आहे.