गंगातीठा परिसरात दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली Pudhari
रत्नागिरी

Rajapur Car Accident | मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; प्रवासी जखमी

गंगातीठा परिसरातील अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान; जखमींवर राजापूर रुग्णालयात उपचार

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Goa Highway Accident

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीठा परिसरात बुधवारी (दि. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयासह शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या मात्र समजू शकलेली नाही. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणारे एमएच ०५ एफव्ही ७२६९ क्रमांकाचे वाहन गोव्याच्या दिशेने येत होते. गंगातीठा परिसरात आल्यानंतर हे वाहन अचानक विरुद्ध दिशेला गेल्याने समोरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एमएच ४६ सीएच ९१९६ क्रमांकाच्या वाहनाला जोरदार धडकले.

या धडकेत दोन्ही वाहनांमधील प्रवासी जखमी झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही. त्यापैकी एका वाहनात लहान मूल असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर जखमींना तातडीने राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही वाहनांची पाहणी करून अपघाताबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. तसेच जखमींवर उपचार सुरू असलेल्या दोन्ही रुग्णालयांमध्येही पोलिसांचे पथक दाखल झाले होते. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची संख्या याबाबत पोलिसांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT