अनुज जोशी
खेड : खेड शहरातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिवसेंदिवस वाढत्या वर्दळीचा परिसर म्हणून प्रभाग क्रमांक 9 ओळखला जातो. 1,608 लोकसंख्या असलेल्या या प्रभागात अ.जा. 50 तर अ.ज. 8 नागरिक वस्ती करतात. मात्र शहराचे हृदय म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग अनियोजनाच्या छायेत अडकला आहे.
उत्तरेला प्रभाग 4 व 5, पूर्वेस प्रभाग 4, दक्षिणेस प्रभाग 10 व जगबुडी नदी तर पश्चिमेस प्रभाग 8 या सीमा त्याला लाभल्या आहेत. कुंभारआळी, नगर परिषद वसाहत, जिल्हा परिषद वसाहत, शिवाजी चौक, समर्थ नगर, कचरा डेपो परिसर, चिपळूण नाका, मुकादम हायस्कूल व पंचायत समिती कार्यालय ही मुख्य ठिकाणे या प्रभागात येतात.