रत्नागिरी

Vaibhav Khedekar: खोटा दस्तऐवजप्रकरणी मनसेचे वैभव खेडेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

अविनाश सुतार

खेड: पुढारी वृत्तसेवा : येथील नगरपरिषदेच्या ठरावातील मुळ मजकुरात बदल करुन महत्वाच्या तपशीलाव्यतिरिक्त अधिकच्या मजुकराची नोंद घेत खोटा दस्त ऐवज तयार केला. याप्रकरणी खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या आदेशानुसार कर्मचारी रूपेश एकनाथ डंबे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. Vaibhav Khedekar

खेड नगरपरिषदेत डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत नगराध्यक्ष असताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी नगरपरिषदेच्या ठरावातील मूळ मजकुरात असलेला महत्वाच्या तपशीला व्यतिरिक्त अधिकच्या मजुकराची नोंद घेवून खोटा दस्त ऐवज तयार केला. हा दस्तऐवज खरा असल्याचे भासविले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. Vaibhav Khedekar

Vaibhav Khedekar : माजी मंत्री रामदास कदम यांनी २०२१ मध्ये केले होते आरोप…

३० जानेवारी २०२० सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १२२ नगरसेवकांच्या विभागातील प्रत्येकी दोन कामांना मंजुरी देणे, या ठरावात आणखी १५ कामे दाखवून हा ठराव बदलण्यात आला होता. तर ११ मार्च २०२० चा १३७ वा ठराव विकासकामांना परस्पर ठराव बदलून मंजुरी देण्यात आली. याच ठरावात दवाखाना दुरुस्ती अशा जुन्या ठेकेदाराचा ठेका कायम करण्यात आला होता. तसेच चालकाचे मानधन, महिला बालकल्याण समितीच्या ठरावात बदल करण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी २०२१ मध्ये केला होता. या अनुषंगाने प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकारातील कागदपत्रानुसार तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT