Rajapur Gram Panchayat 
रत्नागिरी

Rajapur Gram Panchayat | राजापूरचा गावगाडा तापणार! 15 ग्रामपंचायतींच्या 21 जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

Rajapur Gram Panchayat | विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका पुढील एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : पुढारी वृत्तसेवा

विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका पुढील एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामध्ये तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीतील २१ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.

यामुळे आता गावा-गावातील राजकारण तापणार आहे. विविध कारणानिमित्त रिक्त राहिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या निवडणुकीमध्ये कोळवणखडी प्रभाग-१ (सर्वसाधारण), प्रभाग-२ (नामप्र महिला), नाणार प्रभाग-१ (नामप्र महिला), झर्ये प्रभाग २ (अनुसूचित जाती), प्रभाग-२ (नामप्र महिला), वडदहसोळ प्रभाग-३ (नामप्र महिला), येळवण प्रभाग-३ (अनसूचित जाती), हातिवले प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला), खरवते प्रभाग-२ (सर्वसाधारण महिला), केळवली प्रभाग-२ (सर्वसाधारण महिला), प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला),

केळवली प्रभाग-४ (सर्वसाधारण महिला), माडबन प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला), भालावली प्रभाग १ (सर्वसाधारण), कळसवली प्रभाग-३ (सर्वसाधारण), प्रभाग-३ (सर्वसाधारण महिला), कोंड्येतर्फ सौंदळ प्रभाग- २ (नामप्र महिला), कोंड्येतर्फ सौंदळ प्रभाग-३ (सर्वसाधारण), साखर प्रभाग-३ (नामप्र), प्रिंदावण प्रभाग २ (सर्वसाधारण), धाऊलवल्ली प्रभाग-३ (सर्वसाधारण) अशा तालुक्यातील १५ ग्रा.पं. मधील २१ जागांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी ७ ते १३ एप्रिल या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे, १५ एप्रिलला उमेदवारी अर्ज छाननी, १७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे तर, २८ एप्रिल ला मतदान आणि २९ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीनिमित्त पुन्हा एकदा संभाव्य उमेदवारांचा शोध घेण्याची मोहीम राजकीय पक्षांनी आतापासून सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT