Konkan SSC Result
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहिर करण्यात आला. 12 वी प्रमाणेच 10 वी च्या निकालातही कोकणातील मुलांनी पुन्हा बाजी मारली आहे.
राज्यात सलग 14 व्या वर्षी कोकण बोर्ड अव्वल ठरला आहे. एकूण 98.82 टक्के निकाल लागला असून त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा 98.58 टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 99.32 टक्के इतका निकाल लागला आहे.
जिल्ह्यात 486 विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर कोकण बोर्डात 9 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.