Lok Sabha Election 2024,  
रत्नागिरी

लोकसभा निवडणूक मुंबईत अन् धावपळ रत्नागिरीत

अविनाश सुतार

[author title="दीपक कुवळेकर " image="http://"][/author]

रत्नागिरी: मुंबईत सोमवारी (दि.२०) होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या व्हिलचेअर (दिव्यांगासाठी) ची मागणी करण्यात आली आहे. तब्बल ५०० खुर्च्या देण्याचा फतवा वरिष्ठ प्रशासनाने काढल्याने जिल्हा परिषद प्रशासन त्यात गुंतले आहे. यामुळे निवडणूक मुंबईत पण धावपळ रत्नागिरीत अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील धामधूम संपली असली तरी मुंबईतील सर्व ६ मतदारसंघात २० मेरोजी मतदान होत आहे. तब्बल २ हजार ५१७ मतदान केंद्र आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी व्हिलचेअरची आवश्यकता असते. त्यासाठी यावर्षी प्रशासनाने नामी शक्कल लढवली आहे. जिल्हा परिषदेला खुर्च्या जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसे पत्र मुंबई निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. जिल्हा पदिषदेतर्फे ग्रामपंचायतीना यापूर्वी व्हिलचेअर देण्यात आल्या आहेत. या व्हिलचेअर देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. व्हिलचेअर या प्रत्येक ग्रामपचांयतींकडून जमा करुन त्या चिपळूण येथे आणून ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

मुळात या खुर्च्यांची वाहतूक करावी लागणार आहे. त्यानंतर त्या खुर्च्या तिथपर्यंत पोहोचवणे जिल्हा परिषदचे काम असणार आहे. या खुर्च्या पुन्हा जमा कराव्या लागतील. त्यानंतर त्या परत जिल्ह्यात आणाव्या लागतील. विशेष म्हणजे या खुर्च्या गायब झाल्या. तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या कामात प्रशासन गुंतले आहे. या अजब फतव्याचा त्रास प्रशासनाला चांगलाच होत आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT