Maharashtra HSC Result 2025
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (12 वी) प्रमाणपत्र परीक्षेत कोकण बोर्ड राज्यात अव्वल ठरले आहे. सलग 13 वर्ष कोकणातील मुलं राज्यात अव्वल ठरली आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्याचा निकाल 96.74 टक्के इतका लागला आहे.
फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. कोकण बोर्डाकडून या परीक्षेला एकूण 23 हजार 563 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 22 हजार 797 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरीतून 15 हजार 297 पैकी 14 हजार 635 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्याचा निकाल 95.67 इतका लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 8 हजार 266 पैकी 8 हजार 162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल 98.74 टक्के लागला आहे, तर कोकण बोर्डाचा निकाल 96.74 टक्के इतका लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नेहमी प्रमाने यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागाने बाजी मारली तर सर्वात कमी लातूर विभागाचा निकाल लागला आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतिची टक्केवारी 94. 58% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 आहे. फेब्रुवारी 2024 चा निकाल 93.37% होता त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल 1.49 टक्क्यांनी कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.