Ratnagiri Zilla Parishad
पावसामुळे जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे 
रत्नागिरी

रत्नागिरी : पावसाचा जि. प. ला एक कोटीचा फटका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत बर्‍यापैकी पाऊस पडला आहे. काहीवेळा वादळी वाराही सुटला होता. पाऊस व वादळी वारा जिल्हा परिषदला तब्बल 1 कोटी रुपयांना पडला आहे. जि. प. च्या एकूण 78 मालमत्तांचे नुकसान झाले आहे.

सध्या जिल्ह्यात सरासरी पाऊस पडत आहे. अजून म्हणावा तसा जोर घेतला नसला, तरी पडलेला पाऊस पुरेसा आहे. काहीवेळा वादळी वार्‍याचासुद्धा जिल्ह्यातील काही भागांना फटका बसला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान हे रस्त्यांचे झाले आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत इमारत, आरोग्य केंद्र इमारत, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने, साकव यांचेही नुकसान झाले आहे.

मंडणगड तालुक्यात 3 प्राथमिक शाळांचे 2 लाख 16 हजार 600, 1 जि.प. रस्ता 24 हजार, दापोली तालुक्यात 3 ग्रा.पं. इमारतींचे 1 लाख 25 हजार, 1 अंगणवाडी इमारतीचे 15 हजार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे 12 लाख, जि.प. च्या सहा रस्त्यांचे 88 हजार, साकव 5 हजार, खेड ग्रामपंचायत सात इमारतीचे 4 लाख, 3 अंगणवाडी इमारतीचे 1 लाख, 1 प्राथमिक आरोग्य केंद्र 2 लाख, 4 जि.प. ररस्त्यांचे 50 लाख, 2 साकवांचे 18 लाख. चिपळूण एक नळपाणी योजना 2 लाख, 3 ग्रा.पं. इमारत 55 हजार, दोन प्राथमिक शाळा 1 लाख 22 हजार, 5 अंगणवाडी इमारत 82 हजार, 2 पशुसंवर्धन दवाखाने 23 हजार, एक जि.प. रस्ता 3 हजार. गुहागर तालुक्यात एक ग्रा.पं. इमारत 5 हजार. संगमेश्वर तालुक्यात 1 ग्रा.पं. इमारत 18 हजार, 7 ग्रा.,पं. इमारत 1 लाख, 1 प्राथमिक आरोग्य केंद्र 30 हजार, 2 प्राथमिक उपकेंद्र 20 हजार, 1 जि.प. रस्ता 10 हजार नुकसान झाले.

रत्नागिरी तालुक्यात 6 ग्रा.पं. इमारती 3 लाख 53 हजार, एक रस्ता 7 हजार, लांजा तालुक्यात दोन ग्रा.पं. इमारती 10 हजार, दोन अंगणवाडी इमारत 7 हजार 500, राजापूर तालुक्यात एक प्राथमिक शाळा 1 हजार 500, अंगणवाडी इमारत 2 हजार, 3 ग्रा.पं. इमारतीचे 1 लाख 25 हजार, एका नळपाणी योजनेचे 2 लाख, 25 ग्रा.पं. इमारतीचे 12 लाख 86 हजार, 13 प्राथमिक शाळांचे 4 लाख 48 हजार, 12 अंगणवाडी इमारतींचे 2 लाख 6 हजार, 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे 14 लाख 30 हजार, 2 प्राथमिक उपकेंद्रांचे 20 हजार, दोन पशुसंवर्धन दवाखान्यांचे 23 हजार, 14 जि.प. रस्त्यांचे 50 लाख, 3 साकवांचे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एकूण नुकसान झालेल्या मालमत्तांची संख्या 78 असून, 1 कोटी 2 लाख 14 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

SCROLL FOR NEXT