रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची उत्सुकता असते, त्या बाप्पाचे जिल्ह्यात गणेशभक्तांकडून स्वागत होऊ लागले आहे. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण करीत हरितालिका पूजनच्या दिवशीच काही गणेशभक्तांनी गणरायांचे घरी स्वागत केले. गणपती ही बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, 14 विद्या आणि 64 कलेंचा तो अधिपती आहे. यंदा जिल्ह्यात गणेश चतुर्थीला 1 लाख 69 हजार 426 घरगुती गणपती मूर्तींची, तर सार्वजनिक 126 गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
गतवर्षी 2024 पेक्षा यावर्षी घरगुती गणपतींमध्ये तब्बल 2 हजार 559 गणेशमूर्तींची वाढ झाली आहे, तर सार्वजनिक गणपतींमध्ये 4 गणेशमूर्तींची वाढ झाली आहे. या वर्षीच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय रत्नागिरी शहर 7,913 घरगुती, तर सार्वजनिक 27, रत्नागिरी ग्रामीण 13,065 घरगुती, तर सार्वजनिक 0, जयगड घरगुती 3,450, तर घरगुती 5, संगमेश्वर 13,544 घरगुती, तर सार्वजनिक 2, राजापूर 20,092 घरगुती, तर सार्वजनिक 7, नाटे 7,078 घरगुती, तर सार्वजनिक 4, लांजा 16,131 घरगुती, तर सार्वजनिक 6, देवरूख 12,493 घरगुती, तर सार्वजनिक 7, सावर्डे 12,022 घरगुती, तर सार्वजनिक 1, चिपळूण 16,725 घरगुती, तर सार्वजनिक 16, गुहागर 14,460, तर सार्वजनिक 2, अलोरे 4,561 घरगुती, तर सार्वजनिक 4, खेड 12,700 घरगुती, तर सार्वजनिक 21, दापोली 6,335 घरगुती, तर सार्वजनिक 9, मंडणगड 2,955 घरगुती, तर सार्वजनिक 10, बाणकोट 682 घरगुती, तर सार्वजनिक 2, पूर्णगड 3,721 घरगुती, तर सार्वजनिक 1 आणि दाभोळ 1,499 घरगुती, तर सार्वजनिक 1 अशा घरगुती आणि सार्वजनिक मिळून एकूण 1 लाख 69 हजार 552 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.
गणेशोत्सव 27 ऑगस्टला सुरू होऊन 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला समारोप होणार आहे. गेले तीन-चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारपासून पुन्हा हजेरी लावली. पावसातूनच अनेकांनी घरी गणेशमूर्ती आणल्या.