Car damaged by tree collapsed in Devrukh
देवरूखात झाड कोसळून कारचे नुकसान. Pudhari File Photo
रत्नागिरी

देवरूखात झाड कोसळून कारचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : शहरातील सोळजाई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दत्तमंदिराजवळ झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. त्या रस्त्यावर उभी असणाऱ्या कारवर झाड कोसळल्याने गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे. हि घटना रविवारी दुपारी घडली.

माणिक चौक परिसरातील रस्त्यालगत असणारे जूने झाड दुपारी २.३० च्या दरम्याने उन्मळून पडले. याच झाडाखाली संजय शेडगे यांची स्विफ्ट डिझायर उभी होती. या गाडीवरच झाडा पडले. झाडाचा मुख्य भागच गाडीवर पडल्याने पुर्ण गाडीचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस सायंकाळपर्यंत कोसळत होता. पावसाचा जोर असल्याने शास्त्री, सोनवी, गडगडी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. यात संगमेश्वर देवरुख मार्गावरील बुरंबी गेल्ये वाडी येथे सोनवी नदीचे पाणी रस्तावर आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. याच प्रमाणे संगमेश्वर बाजारपेठेत दुपारी पासून पाणी भरले आहे. माखजन, फुणगूस, धामणी, करजुवे या ठिकाणी नद्यांना पुर आला आहे. यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT