रत्नागिरी

साडवली बैलगाडा स्पर्धा : खेर्डे कातळवाडीच्या सचिन म्हादे यांची बैलजोडी प्रथम

मोहन कारंडे

साडवली; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे माऊली-बालाजी ग्रुप देवरूखच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत खेर्डे कातळवाडी येथील सचिन म्हादे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. संगमेश्वर तालुक्यात प्रथमच झालेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शर्यतप्रेमींनी तुफान गर्दी केली होती. या स्पर्धेत एकाचवेळी ५ बैलगाड्या पळवण्यात आल्या. हे या स्पर्धेचे वैशिष्ठ्य ठरले.

या स्पर्धेमध्ये ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दिलीप बाबू दिडे (वारूळ) यांच्या बैलगाडीने दुसरा, साहिल सुरेश चाळके (चिंचघरी) तिसरा, प्रेम प्रदीप कदम (आवाशी) चौथा तर ओमकार चंद्रकांत हुमणे (आगवे) यांच्या बैलगाडीने पाचवा क्रमांक पटकावला. यावेळी बोलताना किरण सामंत यांनी "बैलांना आणि शेतकऱ्यांना दुखापत होणार नाही याचे भान ठेवून स्पर्धा खेळा. आपल्या सगळ्यांच्या उत्साहाला मी सलाम करतो. भविष्यात या स्पर्धेला लागेल ती मदत करू," असे अश्वासन दिले.

या स्पर्धेचे उदघाटन किरण सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रमोद पवार, बारक्याशेठ बने, सुदेश मयेकर, ओंकार मोरे, बंड्या बोरुकर, प्रसन्न सार्दळ, सरपंच संतोष जाधव, सावी खरात, राजेश जाधव, पप्पू नाखरेकर, उमेश देसाई, रमेश परंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT