सिंधुदुर्ग: केर येथे टस्कराकडून माडाची झाडे उद्ध्वस्त; शेतकरी धास्तावला | पुढारी

सिंधुदुर्ग: केर येथे टस्कराकडून माडाची झाडे उद्ध्वस्त; शेतकरी धास्तावला

दोडामार्ग, पुढारी वृत्तसेवा : केर येथे टस्करासहीत पिल्लाचे आज (दि.१०) सायंकाळी आगमन झाले. हे दोन्ही हत्तींनी माडाची झाडे उद्ध्वस्त केली. ऐन काजू हंगामात हत्ती पुन्हा गावात दाखल झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

घाटीवडे, बांबर्डे परिसरात तीन महिन्यांपूर्वी टस्कर व पिल्लू दाखल झाले होते. त्यांनी जवळपास दोन महिने तिलारी खोऱ्यात उच्छाद मांडला होता. महिन्याभरापूर्वी हे हत्ती या खोऱ्यातून माघारी गेले. मात्र, ऐन काजूच्या हंगामात टस्कर व पिल्लाचे पुन्हा आगमन झाले आहे. हे हत्ती आज सायंकाळी केर गावात दाखल झाले. तेथील माड उद्ध्वस्त करून तो फस्त केला. गावात हत्ती आल्याची बातमी ग्रामस्थांना समजताच ते हत्तींना हुसकवण्यासाठी गेले. मात्र, टस्करासोबत लहान पिल्लू असल्याने हत्ती टचूभरही हलला नाही. सध्या काजूचा हंगाम असल्याने शेतकरी काजू बागेत वावरत आहेत. यातच हत्ती दाखल झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा 

Back to top button