रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे आज (रविवार) सकाळच्या सुमारास गॅस टँकरने मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये मिनीबस चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळून मिनीबसमधील 30 प्रवासी जखमी झाले. त्यातील एक गंभीर जखमी आहे.
अपघातातील जखमींवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गॅस टँकरमधील गॅस लिक होउन आजुबाजुच्या दोन घरांना लाग लागली असून, त्यात एक म्हैस होरपळली आहे. त्या ठिकाणी अग्निशमन दल आणि ग्रामीण पोलिस दाखल झाले असून परिस्थितीत नियंत्रणात आणण्याचे काम युध्द पातळीवर सूरु आहे.
संतोष कृष्णकांत जागुष्टे (वय 28), विराज रामाटाम सावंत (41), मंदार सुखदेव खाडे(53), स्मिता मधुकर पाटील(48), उषा अमोल खुडे(38),जयश्री सुर्यकांत गावडे(54),प्रियंका दिलीप जाधव (38), नेहा संतोष मेघो (47), धर्मेंद्र दत्तात्रय के देरुगडे (53), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे(53),सुलक्षणा संभाजी पाटील(40), निशिकांत दिनानाथवा वानरकर (51),रुपाली सुकांत यादव (50),हर्षाली हेमंत पाकळे (36)
निता विनायक बांदरे(38),मिना सुभाष घाडगे (52), कमल किशोर महाडिक (37),प्रेमकुमार बबन शिवगण(35),अमोल गणेश कोनवाल(35),मनिषा संतोष कांबळे (47) ,मालिनी दिपक चव्हाण(40), श्वेता संजय चव्हाण(48),राजेश यादव(47),गणेश महादेव सावर्डेकर(45), सुरेंद्र दिपक सावंत(50), सचिन अशोक पोकळे(43),उदय पांडूरंग खताते(52),अरविंद अनंत सकपाळ (57), मिना विनायक शिरकर(38) आणि रोहित राजेंद्र चव्हाण(35) अशी अपघातामधील 30 जखमींची नावे आहेत.