खेड; पुढारी वृत्तसेवा : येथील नगरपरिषदेची मुदत डिसेंबर 2021 मध्ये संपली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवार दिनांक 28 रोजी दुपारी 1 वाजता नगरपरिषदेचे सभागृहात पालिकेच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी काढून आरक्षण जाहीर केले आहे.
खेड शहरवासीयांनी सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास सोमवारी दि. 28 रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले होते. त्यानुसार आरक्षण प्रांताधिकारी राजश्री मोरे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यानी हे आरक्षण जाहिर केले. ओम जिवन मुद्राले याने नऊ प्रभागात चिठ्ठी काढून 5 प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आल्या.
प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे :
प्रभाग १- अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग , ब-सर्वसाधारण महिला , प्रभाग २- अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग ३-अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग ४-अ अनुसूचित जाती, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ५- अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ६-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग ७- अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ८-अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग , ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ९-अ-सर्वसाधारण महिला , ब-सर्वसाधारण, प्रभाग १०-अ-नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला, ब-सर्वसाधारण, असे आहे.
हेही वाचा