कोकण

रत्नागिरी : चिमुकल्यासह पत्नीचा खून करुन पती पसार

backup backup

लांजा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे पतीने ६ वर्षांच्या चिमुकल्यासह पत्नीचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि.३) पहाटेच्या सुमारास घडली. घरगुती वादातून आरोपीने हे खून केले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. माथेफिरुने सोनाली चांदवडे (वय २५), मुलगा प्रणव चांदवडे (वय ६) असे खून झालेल्या पत्नी आणि मुलाचे नाव आहे. संदेश रघुनाथ चांदवडे (वय ३५) असे खून करुन पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथील रहिवासी असलेला संदेश चांदवडे (वय ३५) हा आपली आई आशा चांदवडे, पत्नी सोनाली चांदवडे, मुलगा प्रणव चांदवडे आणि दुसरा मुलगा पियुष चांदवडे यांच्यासह राहत होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास संदेशने पत्नी सोनाली चांदवडे आणि मुलगा प्रणव चांदवडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये बायकोच्या मानेवर कोयत्याने वार केले. यातील एक वार खोलवर आणि वर्मी बसल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा प्रणवला उशीने दाबून श्वास कोंडून मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

संदेश आणि त्याची पत्नी सोनाली यांच्यामध्ये गेले काही महिन्यांपासून घरगुती कारणावरून वाद सुरु होते. यामध्ये सोनाली ही दहा दिवसांपूर्वी घरात काहीही न सांगता तिच्या माहेरी सांगली येथे गेली होती. संदेशने लांजा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झालेल्याची तक्रार देखील दिली होती. या तक्रारीनंतर पोलिस आणि त्याने स्वतः शोध घेतला असता संदेशची पत्नी माहेरी असल्याचे आढळून आले होते. यानुसार माहेरी जाऊन संदेशने निर्माण झालेले वाद तात्पुरत्या स्वरूपात सोडवले होते. वाद मिटल्यानंतर २८ जुलैला पत्नीला आणि मुलांना त्याने घरी परत आणले होते. दरम्यानच्या पाच-सहा दिवसांच्या काळात हे घरगुती वाद पुन्हा उफाळून आल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. यादरम्यान त्यांच्यात पुन्हा खटके उडत असल्याने अखेर या वादाचे रुपांतर अमानुषपणे खून करण्यापर्यंत गेले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT