डोळ्याच्या रेटिनाला सूज कशामुळे येते?, जाणून घ्या कारणे

डोळ्याच्या रेटिनाला सूज कशामुळे येते?, जाणून घ्या कारणे

मॅक्युलर एडिमा म्हणजे डोळ्याच्या रेटिनाला काही कारणाने येणारी सूज. ही सूज येण्याची अनेक कारणे आहेत. अशी सूज आढळून आल्यास त्वरित तपासणी करून उपचार होणे गरजेचे आहेत. अन्यथा द़ृष्टी हिरावली जाण्याची भीती असते.

डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो रेटिना. रेटिना म्हणजे पेशींचा पातळ आणि संवदेनशील थर जो डोळ्यांच्या आतील बाजूस असतो. रेटिनावर जो प्रकाश पडतो तो नाजूकपणे विस्तृत संदेशामध्ये बदलण्यासाठी रेटिनाचे अनेक थर एकत्रित कार्यरत असतात. हा प्रकाश मेंदूच्या व्हिज्युअल कोर्टेक्सपर्यंत जातो. त्यात मॅक्युला महत्त्वाची भूमिका बजावतो. मॅक्युला रेटिनाचा भाग आहे. त्यामुळे दूरच्या वस्तू आणि त्यांचे रंग अगदी बारकाईने आणि विस्तृतपणे पाहता येणे शक्य होते.

मॅक्युलर एडिमा म्हणजे काय?

काही वेळा रेटिनामध्ये पातळ द्रव पदार्थ साठल्यामुळे किवा स्रवल्यामुळे हे द्रव शोषून घेण्याची रेटिनाची क्षमता प्रभावित होते. मग मॅक्युलर एडिमाचा त्रास होतो. जसे जमिनीवर खूप जास्त पाऊस झाल्यानंतर चिखल होतो आणि अतिरिक्त पाणी काढून ते सुरक्षित ठेवतो त्याचप्रमाणे रेटिनामध्ेय द्रव पदार्थाचे प्रमाण वाढले की रेटिनाला सूज येते. त्यालाच मॅक्युलर एडिमा असे म्हणतात.

कारणे कोणती?

मॅक्युलर एडिमा हा काही आजार नाही मात्र इतर काही आजारांच्या परिणाम म्हणून तो होतो. मॅक्युलर एडिमाची अनेक कारणे आहेत. जसे –
* मेटाबोलिक स्थिती (मधुमेह)
* रक्तवाहिन्यांचे आजार (नसांमध्ये अवरोध किंवा अडथळा) * वाढते वय (मॅक्युलर डिजनरेशन) * अनुवांशिक रोग(रेटिनाइटिस पिगमेंटोसा)
* मॅक्युला वर ट्रॅक्शन(मॅक्युलामध्ये छेद आणि व्हिट्रियोमॅक्युलर ट्रॅक्शन)
* दाह करणारे त्रास * विषाक्तता
* डोळ्यांतील ट्यूमर * डोळ्यांची शस्रक्रिया * रक्तवाहिन्यातून द्रव पदार्थ स्रवणे(उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे).

लक्षणे कोणती आहेत?

मॅक्युलर एडिमामध्ये मॅक्युलाच्या थरांमध्ये द्रव पदार्थ साठून राहातो. मग रेटिनाला सूज येते त्यामुळे वस्तूची प्रतिमा नीट दिसत नाही त्यामुळे व्यक्तीला स्पष्ट दिसत नाही. सूज जितकी जास्त, गंभीर असेल तितकेच व्यक्तीला अस्पष्ट आणि धुरकट दिसते. शिवाय वाचणे, पाहणे यात अडचणी जाणवतात. मॅक्युलर एडिमावर उपचार न केल्यास स्थिती गंभीर होऊन क्रोनिक मॅक्युलर एडिमामुळे मॅक्युलाचे कायमस्वरूपी नुकसान होतेच पण द़ृष्टीवरही कायमस्वरूपाचा परिणाम होतो. मॅक्युलर एडिमा होण्याचे सर्वसाधारण कारण म्हणजे इजा झालेल्या रेटिनल रक्तवाहिन्यांतून अधिक प्रमाणात स्राव बाहेर पडल्याने किंवा रेटिनामध्ये असामान्य रक्त वाहिन्यांचा विकास झाल्याने होतो. नव्या रक्त वाहिन्यांमध्ये सर्वसामान्यपणे टाईट जंक्शन नसते त्यामुळेच रेटिनामध्ये तरल किंवा द्रव पदार्थांच्या असामान्यपणे स्रवण्याचे कारण असते.

उपचार कोणते आहेत?

मॅक्युलर एडिमासाठी सर्वात प्रभावी उपचार म्हणजे हा त्रास होण्यासाठी जी अंतर्गत कारणांबरोबरच (जसे मधुमेह, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, नियोव्हॅस्कुलराईजेशन, इन्फ्लमेंशन) मॅक्युलामध्ये आणि त्याचा आसपास असामान्य रक्तवाहिन्यांतून स्रवणारा द्रव पदार्थ थांववणे. डोळ्यात टाकली जाणारी औषधे, लेसर उपचार आणि शस्त्रक्रिया अनेक आजारांत प्रभावी ठरते. मात्र उपचाराचा मुख्य आधार आहे तो इंट्राविट्रियल इंजेक्शन. मॅक्युलर एडिमा एकाच जागेवर असेल तर फोकल लेझर केले जाऊ शकते. इंट्राविट्रियल इंजेक्शन ही एका दिवसात होणारी उपचार पद्धती आहे. ज्यासाठी टॉपिकल अन्सास्थेशिया देऊन करता येते. त्यात थोड्या प्रमाणात औषधे छोट्या सुईच्या मदतीने डोळ्यात टाकले जाते. आयवीआय हा उपचार प्रशिक्षित रेटिना विशेषज्ज्ञाकडून करून घेतले पाहिजे. सध्या मॅक्युलर एडिमाच्या संख्येत वाढ होण्याचे कारण म्हणजे असंतुलित जीवनशैली. मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे देखील आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news