Kalyan Domestic Violence Case Pudhari
कोकण

Kalyan Domestic Violence Case: अंडकोष काढल्याची माहिती लपवून विवाह; पत्नीची पोलिसांत तक्रार

कल्याणात पती व सासरच्यांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या पतीने लग्नापूर्वी त्याचे एक अंडकोष काढल्याची माहिती लपवून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंडकोष काढल्यामुळे विवाहानंतर आपणास लैंगिकते बाबतीत काही समस्या येऊ शकतात, ही माहिती मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला असलेल्या उच्च शिक्षित पतीसह त्याच्या माता-पित्याने आपल्यापासून लपवून ठेवली.

विवाहानंतर पतीने आपणास शारीरिक आणि मानसिक सुख देण्यास नकार दिला. याऊलट पतीसह त्याच्या माता-पित्याने आपला शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार विवाहानंतर आठ वर्षांनी एका विवाहितेने पोलिस ठाण्यात दाखल केली.

मुंबईत एक बहुद्देशीय कंपनीत वरिष्ठ श्रेणीतील अभियंता म्हणून नोकरी करणारी तक्रारदार महिला सद्या कल्याणमधील आपल्या आई/वडिलांच्या घरी राहते. मर्चंट नेव्हीत नोकरी असलेल्या पतीने पत्नीकडे घटस्फोट देण्याची मागणी केली आहे. या महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ वर्षांपूर्वी ठाण्यातील मर्चंट नेव्हीत नोकरीला असलेल्या एका तरूणाबरोबर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्नानंतर हे दाम्पत्य हनीमूनसाठी दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे पतीने आपणास शारीरिक आणि मानसिक सुख दिले नाही. आपण प्रेमाच्या गोष्टी केल्या की पती चिडचिड करत असायचे.

भांडण उकरून काढून आपणास दूर लोटत असायचे. मर्चंट नेव्हीत असल्याने पती सहा महिने नोकरीच्या ठिकाणी आणि सहा महिने घरी राहत होते. सुखाने संसार करायचा असल्याचे पती पत्नीला सतत सांगत असत. दोघांनी एका डॉक्टरकडे जाऊन तपासण्या देखिल करून घेतल्या. तपासणीमध्ये पतीची लैंगिक क्षमता कमी असल्याचे आढळले होते. तरीही पत्नीने पतीला धीर देऊन आपण अन्य डॉक्टरकडे जाऊन आवश्यक उपचार करून घेऊ असे सांगितले होते. पतीकडून शारीरिक व मानसिक सुख मिळत नसल्याने पत्नी अस्वस्थ होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT