कोकण

रत्नागिरी: दापोली येथील आराम बसचा नायगाव-घोडबंदर रोडवर अपघात

अविनाश सुतार

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथून रोज खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या आराम बसला नायगाव – घोडबंदर रोडवर आज (दि.२३) भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एक जण जखमी झाला. प्रशांत भुवड खेर्डी (रा.दापोली) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साईदत्त ही खाजगी आराम बस करंजाणी येथील शेखर कालेकर यांच्या मालकीची आहे. नायगाव घोडबंदर रोडवर कंटेनरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. बसमधील आणखी कुणी जखमी आहेत की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही. ही बस दररोज दापोली ते विरार या मार्गावर धावते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT