महाराष्ट्र

Parambir Singh : परमबीर सिंग यांना अंतरिम दिलासा २४ मार्चपर्यंत कायम

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  (Parambir Singh) यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिलेले आहे. या दिलाशात न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वाढ केली. गैरवर्तणूक तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सिंग यांच्यावर आहेत. सिंग यांना देण्यासाठी आलेला दिलासा २४ मार्चपर्यंत कायम राहील, असे न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

सिंग (Parambir Singh) यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी थांबवावी, असे निर्देश याआधीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले होते. राज्य सरकार आणि सिंग यांची एकमेकांविरोधात सुरु असलेली चिखलफेक दुर्दैवी असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. महाराष्ट्र सरकारने सिंग यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे द्यायचा की नाही, यावर न्यायालय विचार करीत आहे. दरम्यान आरोपांची चौकशी सीबीआयकडे देणे योग्य राहील, असा मुद्दा आजच्या सुनावणीवेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडला.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : "महिलांनी राजकारणात आलं पाहिजे" – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women's Day 2022

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT