Eknath Shinde Next Maharashtra CM Pudhari
महाराष्ट्र

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात खळबळ; एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? कोणी केला दावा?

Eknath Shinde Next Maharashtra CM: शिवसेना (शिंदे गट) मंत्री दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा केला असून महायुतीत नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटातील तणाव नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आणखी वाढलेला आहे.

Rahul Shelke

Eknath Shinde next maharashtra cm political tension bjp shiv sena:

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध अलीकडे ताणले गेले असतानाच, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलताना भुसे म्हणाले, “आजही लोकांच्या मनात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत. आणि नियती असेल, तर महाराष्ट्र पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखालील दिसेल.”

“लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे”

भुसे यांच्या मते, शिंदे हे असे मुख्यमंत्री होते जे रात्रभर लोकांना भेटून त्यांच्या अडचणी ऐकायचे आणि दिवसातून तब्बल 20–22 तास काम करायचे. भुसे यांनी पुढे सांगितले की, “महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील शिंदे यांच्या कामाची प्रशंसा करतात.” लोकांच्या अपेक्षा आणि शिंदेंच्या प्रशासकीय शैलीमुळे ते पुन्हा राज्याचे नेतृत्व करू शकतात, असा त्यांनी दावा केला आहे.

महायुतीत तणाव सतत वाढतोय

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटामध्ये नेत्यांना एकमेकांच्या पक्षात घेण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव शिगेला पोहोचवणारे विधान म्हणजे,
भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाच्या आमदारावर केलेले गंभीर आरोप.

मुटकुळे यांनी दावा केला की “कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी 2022 मध्ये ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यासाठी 50 कोटी रुपये घेतले.” मुटकुळे म्हणाले की बांगर यांनी सुरुवातीला ठाकरे गट सोडणार नसल्याचे सांगितले, पण रातोरात भूमिका बदलली.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ‘संयम’ पाळण्याचा सल्ला

राजकीय तणाव वाढू नये म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना संयम राखण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होईपर्यंत भाजपने “शांत राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे” असा सल्ला देण्यात आला आहे.

राजकीय समीकरणे बदलणार

सत्ताधारी महायुतीचे अंतर्गत राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आहे. भाजप–शिंदे–अजित पवार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT