Devendra Fadnavis Meets Sanjay Raut Pudhari
महाराष्ट्र

Sanjay Raut: CM फडणवीस- संजय राऊत भेट, तब्बल 20 मिनिटे चर्चा; कारण समोर

Fadnavis Sanjay Raut Meeting: राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची अनपेक्षित भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली असून फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Rahul Shelke

Devendra Fadnavis Meets Sanjay Raut: राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह समारंभात आज एक आगळीवेगळी राजकीय भेट पाहायला मिळाली. FDA आयुक्त राजेश नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांचे व्याही असल्याने या सोहळ्यात विविध राजकीय मान्यवर हजर होते. त्याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची काही काळासाठी समोरासमोर भेट झाली.

माहितीनुसार, दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नसल्याने राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहिलेल्या संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस फडणवीस यांनी या भेटीत केली. राऊत यांनीही स्वतःची तब्येत आणि चालू उपचारांविषयी थोडक्यात माहिती दिल्याचे कळते.

ही भेट पूर्णपणे खाजगी कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाली असली तरी राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगू लागली आहे. राज्यातील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची असताना वेगवेगळ्या पक्षांचे दोन नेते एका कार्यक्रमात पाहायला मिळाल्याने विविध तर्क–वितर्कांना ऊत आला आहे.

राऊत गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या कारणामुळे सार्वजनिक जीवनात कमी दिसत होते. फडणवीसांनी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.

FAQs

1. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट कुठे झाली?

-FDA आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात दोघांची भेट झाली.

2. या भेटीत राजकीय चर्चा झाली का?

- सूत्रांनुसार, ही चर्चा वैयक्तिक होती आणि मुख्यतः राऊतांच्या तब्येतीबाबत होती.

3. भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात का होत आहे?

- दोन्ही नेते भिन्न राजकीय पक्षांचे असून त्यांची भेट विविध चर्चांना हवा देत आहे.

4. फडणवीसांनी राऊतांना काय विचारले?

- गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली.

5. ही भेट नियोजित होती का?

- नाही, हा एक खाजगी कार्यक्रम होता आणि भेट अनपेक्षित होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT