नगर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील शिक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली शिक्षक बँकेची निवडणूक नीट परीक्षेमुळे सुधारीत कार्यक्रमाव्दारे लांबणीवर पडली आहे. त्यामुळे 13 जून ऐवजी आता 17 पासून अर्ज स्वीकृती होणार आहे, तर 17 जुलैला होणारे मतदान आता 24 जुलै रोजी पार पडणार आहे.
गेल्या आठवड्यात सहकार विभागाच्या एका पत्रानुसार 13 जूनपासून शिक्षक बँकेसाठी अर्ज घेतले जाणार होते. तर 17 जुलैला मतदान घेण्याचा कार्यक्रम ठरला होता. मात्र, मतदानाच्या दिवशीच अनेक सभासद शिक्षकांच्या पाल्यांची नीटची परीक्षा असल्याने शिक्षक भारतीचे नेते दिनेश खोसे व पदाधिकार्यांनी मतदानाच्या तारखेत बदल करावा, अशी लेखी मागणी केली होती.
त्यानंतर अनेक संघटनांनीही ही मागणी उचलून धरली. त्यामुळे उपनिबंधक गणेश पुरी यांनी काल सुधारीत कार्यक्रम तयार केला आहे.
त्यानुसार, आता 17 ते 26 जून अर्ज स्वीकृती, 24 जून रोजी छाननी, 27 जून ते 11 जुलै माघारीचा कालावधी, 12 जुलैला चिन्ह वाटप, 24 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजपर्यंत मतदान प्रक्रिया, दुसर्या दिवशी 25 जुलै रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा