हरियाणाची आगेकूच

File Photo
File Photo
Published on
Updated on

पंचकुला (हरयाणा) ; वृत्तसंस्था : येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पहिल्या दिवसापासून स्पर्धेवर वर्चस्व मिळवलेल्या महाराष्ट्राला मागे टाकून यजमान हरियाणाने तिसर्‍या दिवसअखेरीस पदक तालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला होता. हरियाणाला दिवसभरात दहा सुवर्णपदके मिळाली. कुस्तीपटूंनी चार सुवर्णपदके जिंकून यजमान संघाला आघाडीवर आणले. याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये दोन तर नेमबाजी, गटका आणि योगासनामध्येही सुवर्णपदके मिळाली. महाराष्ट्राला चार सुवर्णपदके मिळाली. यामधील एक पदक सायकलिंगमध्ये तर तीन योगासनामध्ये मिळाली. रविवारी दोन रौप्यपदके जिंकणार्‍या कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने वैयक्तिक 200 मी.मध्ये हे पदक जिंकले.

मणिपूरला दिवसभरात एकच पदक मिळाले, ते म्हणजे मुलांच्या सायकलिंगमध्ये. जम्मू-काश्मीर संघातील खेळाडूने पारंपरिक मार्शल आर्ट प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपले खाते खोलले.

हरियाणाच्या कुस्तीगिरांना कुस्तीच्या पहिल्या दिवशी पाच सुवर्णपदके जिंकली होती. सोमवारीही पाच सुवर्णपदके जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु चंदीगडच्या यशवीर मलिकने 65 किलो ग्रीकोरोमन प्रकारात हरियाणाच्या निशांतला हरवून त्यांचे मनसुबे उधळले. 60 किलो ग्रिको रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या विश्वजित मोरे याला सूरजकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 60 किलो फ्री स्टाईलमध्येही हरियाणानेच बाजी मारली. महाराष्ट्राचा अजय कापडे दुसर्‍या स्थानावर राहिला.

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या साक्षी रानमाळे हिला 55 किलोगटात कांस्यपदक मिळाले. उषा (हरियाणा) आणि बोनी (अरुणाचल प्रदेश) यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य मिळाले.

महाराष्ट्राच्या पोरी, कबड्डीत 'लय भारी'

महाराष्ट्राच्या मुलींनी कबड्डीत आपणच 'लय भारी' असल्याचे दाखवून दिले. तामिळनाडूविरुद्ध झालेला सामना मुलींनी नेहमीप्रमाणे एकतर्फी (23 गुणांनी) जिंकून फायनलमध्ये धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी अवघ्या साडेचार मिनिटांत तामिळनाडूवर लोण चढवले. मुलांचा उत्तर प्रदेशविरुद्ध अटीतटीचा सामना झाला. परंतु अवघ्या चार गुणांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.

योगासनामध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व

मुलांच्या आर्टिस्किट एकेरी गटात जय कालेकर याने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. याच प्रकारात रुपेश सांगे याला कांस्यपदक मिळाले. यातील सांघिक गटात महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात महाराष्ट्राला वैयक्तिक आणि सांघिक दोन्हीमध्ये सुवर्णपदक मिळाले. प्रांजल व्हन्ना हिने वैयक्तिक सुवर्णपदक आपल्या नावावर केले. गोव्याच्या निरल वाडेकरला रौप्य, तर फरजीन जकाती हिला कांस्यपदक मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news