अहमदनगर

नगर जिल्ह्यात पुरामुळे दोन पूल गेले वाहून

backup backup

नगर जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पुरामुळे ढवळपुरी ते वनकुटे ते पळशी दरम्यान असणारे दोन पूल वाहून गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला आहे.

पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात सोमवारी रात्री मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ढवळपुरी, वनकुटे, पळशी, खडकवाडी, वडगाव सावताळ, कामटवाडी, मांडवे, पोखरी, पळसपूर, म्हसोबा झापसह अनेक भागांत मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली. असून, तसेच शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्याच्या उत्तर भागाला जोरदार पावसाने झोडपले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या ढवळपुरी ते वनकुटे आणि पळशी ते वनकुटे या रस्त्यावर बांधलेले दोन्हीही पूल अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले. त्यामुळे या भागातील दळणवळणाची सुविधा कोलमडली आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात भीज पाऊस सुरू असून, सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामध्ये अनेक जुने घरे पडली आहेत. तर, अनेक ठिकाणी बाजरीची काढणी चालू असून, शेतामध्येच काटलेली बाजरीची कणसे या पाण्यात पोहत असल्यामुळे बाजरीसह इतर मालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हेही वाचले का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT