अहमदनगर

नगर : केंद्रीय यंत्रणेकडून ‘मुळा’ची पाहणी; मंत्री शंकरराव गडाख यांच्या अडचणीत वाढ

अमृता चौगुले

सोनई: पुढारी वृत्तसेवा: नेवासा तालुक्यातील मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटीच्या जागेची केंद्रीय यंत्रणेकडून सोमवारी पाहणी करण्यात आली. दुसर्‍यांदा तेही तातडीने जागा पाहण्याची कार्यवाही झाल्याने मुळा एज्युकेशन सोसायटी जमीनदोस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून विद्यार्थी,पालक व शिक्षक ,कर्मचारी यांची अडचण होणार असली तरी खरी अडचण मंत्री शंकरराव गडाख यांचीच होणार आहे.

तक्रारदार आगळे असले तरी त्यामागे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेच करता करविते आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आगळे हे काहीच करू शकत नाही अशी चर्चा सोनई परीसरातील ग्रामस्थांमध्ये आहे. मंत्री गडाख यांना अडचणीत आणण्यासाठी थेट दिल्ली येथून यंत्रणा हलली आहे. विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे किरीट सोमय्या यांनीही मुळा एज्युकेशन सोसायटीच्या विरोधात अर्ज दिला असल्याचे समजते. मुळा एज्युकेशनच्या आडून मंत्री गडाखांचा वाढता राजकीय प्रभाव संपवण्यासाठी विरोधकांनी निशाणा साधला असलेयाचे बोलले जात आहे.

माजी आमदार मुरकुटेंची खेळी
बाळासाहेब मुरकुटे यांनी कट्टर समर्थकला हाताशी धरून मुळा एज्युकेशन सोसायटी व मंत्री गडाख यांना दिल्लीच्या यंत्रणेमार्फत पुरते जेरीस आणले आहे. मुळा एज्युकेशन सोसायटी जमिनदोस्त होणार काय, तसेच मंत्री गडाख यांचे काय पुढे काय होणार, असे प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT