संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा पोलीस प्रमुख राहुल मदने यांच्या पथकाने संगमनेच्या एका अल्पवयीन मुलासह सिन्नर तालुक्यातील एक अशा दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 3 लाख25हजार रुपयांचे 18 मोबाईलसह 1लाख 50 लाख रुपयांची बुलेट दुचाकी 5लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिलेली माहिती अशी, एक महिन्यांपूर्वी आनंद बनभेरु तरुण नाशिक रस्त्यावरील हॉटेल काश्मिर समोरुन मोबाईलवर बोलत पायी जात होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी बनभेरू याच्या हाताला हिसका देवून त्याचा मोबाईल पळवून नेला होता. तत्पूर्वी पुणे-नाशिक बायपास रस्त्यावरील राजापूरच्या पुलाजवळून नाशिक येथील राजेंद्र माळवे यांचाही मोबाईल अशाच पद्धतीने लांबविण्यात आला होता. या दोन्ही घटनांची नोंद संगमनेर शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी हाती घेतला. पथकातील पो. ना. अण्णासाहेब दातीर, पो. काँ. अमृत आढाव, पो. काँ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, गणेश घुले, महिला पोलीस अनिता सरगवे यांच्यासह सायबर सेलचे पो. ना. फुरकान शेख यांना मोबाईल चोरी प्रकरणी तपासावर रवाना केले.
पोलिस पथकाने एका आरोपीचे नाव निष्पन्न केले, मात्र त्याचा नेमका ठावठिकाणा शोधताना तो नाशिक जिल्ह्यातील (विंचूर दळवी, ता.सिन्नर) येथे असल्याचा सुगावा लागला. पथकाने तत्काळ तेथे छापा टाकत दळवी याच्या मुसक्या आवळल्या. खाकी हिसका दाखविताच त्याने संगमनेरातील एका अल्पवयीन मुलाचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीतून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे तब्बल 16 मोबाईलसह दोनआय फोन असा 3 लाख 25 हजारांचा ऐवज हस्तगत केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
हेही वाचा