रुईछत्तीसी पुढारी वृत्तसेवा
नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी तालुक्यात पाण्याची समस्या गंभीर आहे. शेतकरी आणि प्रशासनास ही मोठी डोकेदुखी आहे. पिण्याची असो शेतीची पाणीटंचाई यावर उपाय शोधण्यासाठी या तालुक्यातील शेतकरी बोरवेल, अथवा विहिरीचे खोदकाम करण्यास प्राधान्य देतात, हीच बाब काही ठगांनी ओळखून ती अंमलात आणण्यास सुरुवात केली.
शेतकर्यांना एका विशेष पद्धतीने गंडा घालण्याचे काम काही व्यक्ती करीत असल्याची माहिती हाती आली आहे. ही टोळी आधी मालक गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा विश्वास संपादन करते, तर काहींना खास विशिष्ट मेजवानी दिली जाते. मग इथून या फसवणुकीचा फार्स सुरू होतो. तालुक्यातील अकोळनेर येथील दत्तात्रय रोहकले यांना यांचा प्रत्यय आला.
त्यांनी अकोळनेर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती समक्ष सात परस विहीर खोदकामाचा व्यवहार ठरवला आणि रक्कम देऊन कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली. काम चार परस पूर्ण झाले. या टोळीची खास पद्धतीने गावाला जवळचे नातेवाईक आजारी पडले. भेटायला जावं लागेल, असे विविध कारणांनी त्या ठिकाणी घरी जाऊन येतो, म्हणून जायचं. नंतर संध्याकाळी सर्व खोदकामाचे सर्व मशिन साहित्य घेऊन पोबारा करायचा, तसं रोहकले यांना यांचा पद्धतीने या टोळीने फसविले.
दत्तात्रय रोहकले यांनी या व्यक्तींशी अनेक वेळा संपर्क साधला असता, ते उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. नंतर धमक्या देणे सुरू केले. काम करून देणारा नाही, काय करायचं ते करा आमचं… करत नाही. मग रोहकले यांनी या विषयी नगर तालुका पोलिस ठाणे, तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना लेखी तक्रार दिली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष घालतील का?
याबाबत अधिक माहिती घेतली असता, यात अनेक शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. अकोळनेर येथील धोंडिभाऊ कोळगे, भाऊसाहेब रोहकले, दत्तात्रय रोहकले, चास येथील पांडुरंग गायकवाड, अशा चार शेतकर्यांना अडीच लाख रुपयांना ग़ंडा घातल्याचे समोर आले. या विषयी जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष घालून कारवाई करणार आहेत का? तालुका पोलिस या ठगांना वठणीवर आणून या शेतकर्यांची आर्थिक फसवणूक झाली.
शेतात सात परस विहिरीचे खोदकाम करण्यासाठी ठेकेदारास ठेका दिला होता. मात्र, ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेला. त्याने माझी 70 हजार रुपयांची फसवणूक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक व नगर तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अद्याप न्याय मिळाला नाही. शेतकर्यांना पोलिसांनी न्याय दिला पाहिजे.
– दत्तात्रय रोहकले,
शेतकरी, अकोळनेर.