कोपरगाव : माजी केंद्रीयमंत्री शरदचंद्र पवार यांच्याकडून पुरस्कार स्विकारताना अध्यक्ष बिपिनराव कोल्हे, युवा संचालक विवेक कोल्हे आदी. 
अहमदनगर

कोल्हे कारखान्यास उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार प्रदान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील संस्थेने केला गौरव

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेकडून साखर कारखानदारीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीयमंत्री शरदचंद्र पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुणे येथे गृहमंत्री दिलीपराव वळसे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, व्ही. एस. आय. चे महाव्यवस्थापक शिवाजीराव देशमुख, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

त्याचा स्वीकार कारखान्याचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे, युवासंचालक विवेक कोल्हे, सर्व संचालक मंडळाने केला. दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषद वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. त्याचा समारोप रविवारी झाला. यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकारी साखर कारखानदारीत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश व राज्य पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली असून त्यांची आठवण आजही झाल्यावाचून राहत नाही.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने अनेक पायलट प्रकल्प सुरू करून अन्य कारखान्यांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे, त्यांचा वसा कोल्हे यांची पुढची पिढी समर्थपणे चालवीत आहे, असे उद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यावेळी काढले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची 1960 साली मुहुर्तमेढ रोवली, कारखान्याने आजवर देश व राज्य पातळीवरील 23 पुरस्कार मिळवले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर, काटकसर, खुल्या अर्थव्यवस्थेतील स्पर्धा आणि संधी, साखर व त्यातून उपपदार्थाबरोबरच इथेनॉल, सहवीज निर्मीती आणि आता पॅरासिटामॉल औषधी उत्पादन प्रकल्पाची उभारणी या पंचसुत्रीवर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना देशपातळीवर मार्गक्रमण करत असल्यामुळेच कारखान्याचा हा बहुमान असुन सदरचा पुरस्कार कारखान्याचे सर्व भागधारक सभासद ऊस उत्पादक शेतकरी व ज्ञात-अज्ञात बांधवांना समर्पीत करतो असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यावेळी बोलताना केले.

स्व. शंकरराव कोल्हे यांचा कारखानदारी व सामाजिक कार्याचा वसा घेऊन पुढे वाटचाल करत असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू असे कारखान्याचे संचालक व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी म्हटले. स्व. शंकरराव कोल्हे यांनी हयातभर जोपासलेली साखर कारखानदारी आणि त्यातून मिळालेला हा पुरस्कार त्यांच्याच कार्यकुशलतेचा नावलौकीक असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे दिली.

पुरस्कार प्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सर्वश्री. अरुणराव येवले, सोपानराव पानगव्हाणे, प्रदिप नवले, संजय होन, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, मनेष गाडे, राजेंद्र कोळपे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT