अहमदनगर

करसवलतीकडे नगरकरांची पाठ

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : मनपाच्या मालमत्ताकरधारकांना आगावू कर भरण्यासाठी एप्रिल, मे व जून महिन्यात आठ टक्के सूट दिली जाते. नगर शहरातील मालमत्ताधारकांकडे 213 कोटी 92 लाखांची थकबाकी आहे. यंदा अवघी 16 कोटींची वसुली झाली असून, 30 कोटी 56 लाखांची थकबाकी राहिली आहे. एकूणच मालमत्ताधारकांनी मनपा कर सूट योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसते.

मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरणा न केल्याने आता मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. महापालिकेतर्फे मनपा हद्दीतील मालमत्ताधारकांना सन 2022-23 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या बिलाचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमातील कलम 140 अनुसार सर्वसाधरण करात एप्रिलमध्ये दहा टक्के तर मे व जून मध्ये 8 टक्के अशी मालमत्ताकराचा आगावू भरणा केल्याबाबतची तरतूद आहे. त्यानुसार कराचा भरणा करून आठ टक्के संकलित करात सूट दिली जाते.

महापालिकेकडून, मालमत्ताधारकांकडून सर्वसाधारण कर, पथ कर, मलनिस्सरण, मलनिस्सरण लाभ कर, जललाभ कर, अवैध बांधकाम शास्ती, साफसफाई कर, घनकचरा कर, वृक्ष कर, पाणीपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठ्या निवासी कर यासह विविध गोष्टीसाठी मनपा मालमत्ताधारकांकडून कर वसुल करते. मालमत्ताधारकांकडून चालू वर्षीची 47 कोटी 27 लाख 72 हजार 495 रुपयांची मागणी होती. त्यात चालू वर्षीची अवघी 16 कोटी 70 हजार 90 हजार 172 रुपयांची वसुली झाली आहे. चालू वर्षीच 30 कोटी 56 लाख 82 हजारांची थकबाकी राहिली आहे.
मालमत्ताधारकांकडे आतापर्यंत 213 कोटी 92 लाख 62 हजार 530 रुपयांची थकबाकी राहिली आहे.

कर सूट योजनेचा 30 जून शेवटचा दिवस होता. तीन महिन्यासाठी करात सूट देऊनही मालमत्ताधारकांनी वसुलीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून कर न भरणार्‍या मालमत्ताधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. थकीत मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन बंद करणे, जप्तीची नोटीस बजाविणे, मोटारसायकल जप्त करणे, कर थकविणार्‍यांचे प्लेक्स प्रभात लावणे, थकबाकीदारांकडे जावून मागणी करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.

सवलत देऊनही मालमत्ताधारकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरूद्ध वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे.

                                                        – यशवंत डांगे, उपायुक्त मनपा

आकडे बोलतात

मागणी

गववर्षीची : 1866983606
चालू वर्षाची : 472772495
एकूण : 2339756101

एकूण वसुली

गतवर्षीची : 33403399
चालू वर्षाची : 167090172
एकूण : 200493571

थकबाकी

गतवर्षीची : 1833580207
चालू वर्षीची : 305682323
एकूण : 2139262530

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT