अहमदनगर

Nagar News : ‘कुकडी’तून सीना धरणात सोडले पाणी

अमृता चौगुले

मिरजगाव : पुढारी वृत्तसेवा : संध्याकाळी सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी केली व सकाळी कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी सुटले. यामुळे मिरजगाव परिसरात समाधान पसरले असून, सीना धरण भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आमदार राम शिंदे यांनी समय सूचकता दाखविली. कर्जत तालुक्यातील मिरजगाव भागात यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे पाणीसाठा वाढला नाही. पाऊस झाला नाही तर पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, याचे काय करायचे, असा प्रश्न मिरजगाव परिसरातील शेतकर्‍यांना पडला होता. ही समस्या शेतकर्‍यांनी आमदार राम शिंदे यांच्या कानावर घातली. कुकडी लाभक्षेत्रात सध्या समाधानकारक पाऊस सुरू आहे.

येडगाव धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहे, या धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी नदीत सोडण्यापेक्षा कुकडीचे आवर्तन सोडून सीना धरण व विसापूर तलाव यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आमदार शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. शनिवारी (दि. 30) सायंकाळी पाण्याची मागणी केली व पाटील यांच्या आदेशाने रविवारी सकाळी कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी सुटले.
या ओव्हर फ्लोतून प्रथम सीना धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. नंतर विसापूर तलावात पाणी सोडले जाणार आहे. कुकडीच्या गेल्या आवर्तनातुन सीना धरणात पाणी सोडण्याचे आदेश होते. मात्र, लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने सीना धरणात पाणी सुटले नव्हते. ओव्हर फ्लोमुुळे या भागातील पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT