अहमदनगर

विखेंना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल..!

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा प्रचार तापला असून गावागावात उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते प्रचारात मग्न आहे. अशातच एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून त्यात विखेंचा उल्लेख करत गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील एका गावच्या उपसरपंचासोबतचे हे संभाषण असून धमकी देणारा 'नेत्यांचा' कार्यकर्ता असल्याचा दावा विखे समर्थकांनी केला आहे. तर 'नेत्यांच्या' समर्थकाने हा दावा फेटाळून लावत तो आवाज माझा नसल्याचे स्पष्टीकरण सोशलवर व्हायरल केले आहे. आता पोलिस याची शहनिशा करणार का? आणि उमेदवारांच्या भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाना, विखे आणि राहुल, गणेश नावांचा उल्लेख 'त्या' ऑडिओ क्लीपमध्ये आहे. नेत्यांना बोलायचे, असे सांगत नानासोबत बोला अशी सुरूवात असलेल्या या क्लीपमध्ये गावात बाईट दिली. त्यात 60 टक्के विखे चालेल असे म्हटल्याचा उल्लेख आहे. तीन कोल्हापुर बंधारे, कळस-पाडळी रस्ता दिला. नांदूरपठार रस्ता दिला. त्याबद्दल नाही बोलले असे सुनावत विखेंना खालच्या भाषेत बोलत गोळ्या झाडणार असल्याचे म्हटल्याचे क्लीपमध्ये ऐकू येते. नेत्यांबद्दल जो गावात बोलेल त्याची …. मारणार, अशा धमकीने क्लीपचा शेवट झाल्याचे ऐकू येते.

दरम्यान ही ऑडिओ क्लीप पारनेर तालुक्यातील एका गावच्या उपसरपंच व नेत्यांच्या समर्थकांमधील असल्याचा दावा विखे समर्थकांकडून केला जात आहे. मात्र हा दावा नेत्याच्या समर्थकांकडून खोडून काढताना ती क्लीप बनावट असल्याचा संदेश सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. क्लिपमध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जातो त्यांनी तो आवाज माझा नसून 'नेत्या'चा कार्यकर्ता नसल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार देणार असल्याचे संदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT